भारतीय क्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये सध्या खळबळ माजली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने एक पत्र लिहिले. त्याने पत्रामध्ये पंजाब क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गोष्टींवर आरोप लावले होते. आता संघाचे अध्यक्ष गुलजार इंदर सिंग चहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुलजार यांनी राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले आहे.
गुलजार चहल यांनी सोडले अध्यक्षपद
गुलजार इंदर सिंग चहल (Gulzar Inder Singh Chahal) यांनी गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने पंजाब क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचालींवर आरोप लावण्याच्या काही दिवसांनंतरच हे प्रकरण घडले आहे. मे महिन्यात पदभार सांभाळणाऱ्या गुलजार चहल यांनी पद सोडल्याची पुष्टी केली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षीय गुलजार चहल यांच्यावर पीसीए अपेक्स काऊंसिल आणि पंजाब सरकारचाही पदावरून हटवण्याचा दबाव होता.
हरभजन सिंगने केला होता आरोप
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हरभजन सिंग याने पीसीएमध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याचा आरोप केला होता. हरभजन पीसीएचा मुख्य सल्लागारदेखील आहे. राज्यसभा खासदार हरभजन सिंग याने त्याच्या पत्रामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्याने हे पत्र पीसीए सदस्य आणि जिल्ह्या विभागांना पाठवले होते. हरभजनने गुलजार यांच्या बेकायदेशीर हालचालींबद्दल सदस्य आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवत मान यांनाही पत्र लिहिले होते.
हरभजन करणार पंजाबचे प्रतिनिधित्व?
हरभजनने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मला विश्वास होता की, जर पीसीएमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरकारभार झाला, तर ते मी सहन करणार नाही. माझ्यासमोर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे.” यावर त्याला विचारण्यात आले की, तो बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पीसीएचे प्रतिनिधित्व कोण करेल? यावर उत्तर देत त्याने म्हटले की, “नाही. मी पीसीएचे प्रतिनिधित्व करणार नाही. यावर सदस्य निर्णय घेतील.”
गुलजार इंदर सिंग चहल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पीसीएचे प्रतिनिधित्व कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषकामुळे बीसीसीआय होणार कंगाल? भारत सरकारची नीती ठरणार मारक
T20WC 2022: गंभीरने शाहीन आफ्रिदी तर पठानने बाबर-रिझवान यांच्याविरुद्ध सांगितला ‘गेम प्लान’