---Advertisement---

टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण

---Advertisement---

बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेला न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टील दुखापतीमुळे मुकणार आहे, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली आहे.

गप्टील हा 3 फेब्रुवारीला भारता विरुद्ध झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यालाही दुखापतीमुळे मुकला होता. या सामन्याआधी क्षेत्ररक्षणाचा सराव करताना त्याच्या कमरेला दुखापत झाली होती.

गप्टीलच्या जागी अष्टपैलू जिमी निशामला न्यूझीलंडच्या टी20 संघात जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर गप्टीलला त्याच्या घरी ऑकलंडला पाठविण्यात येणार आहे. तो पुढील आठवड्यात बांगलादेश विरुद्धच्या होणाऱ्या मालिकेपर्यंत फिट होऊ शकतो.

“तो वेळेवर दुखापतीतून सावरला नसल्याने संघासाठी ही वाईट बाब आहे. टी20मध्ये त्याचा खेळ चांगला आहे. तो या दुखापतीमधून लवकर फिट होईल अशी आशा आहे”, असे स्टेड म्हणाले आहेत.

गप्टीलने 76 टी20 सामन्यात 33.91च्या सरासरीने 2272 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे निशामने भारताविरुद्धच्या शेवटच्या वन-डे सामन्यात 32 चेंडूत 44 धावा करत चांगली कामगिरी केली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला टी20 सामना 6 फेब्रुवारीला वेलिंगटन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना 8 फेब्रुवारील ऑकलंड आणि तिसरा सामना 10 फेब्रुवारीला हॅमिल्टन येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ

मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज

युजवेंद्र चहलने हा पराक्रम करत केली कुंबळे, वॉर्न या दिग्गजांची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment