दिल्ली कॅपिटल्स (DC vs MI) विरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवने(suryakumar yadav) शानदार फलंदाजी करत 43 चेंडूत 73 धावा केल्या. सूर्याने त्याच्या शानदार पारीमध्ये 7 चौकार आणि 4 षटकार झळकावले. अवघड खेळपट्टीवर मुंबईला चांगल्या धावसंख्येसाठी गरज असताना सूर्यकुमार शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्याने संघाला 180 च्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. सूर्याच्या याच शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्स 180 धावसंख्या करू शकली आणि याच कारणामुळे मुंबई इंडियन्स संघ जिंकू शकला.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला त्याच्या महत्त्वपूर्ण खेळीसाठी सामनावीर (player of the match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूर्याच्या या खेळीबद्दल भारताचे माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवज्योत सिद्धू यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सूर्यकुमार यादवचे कौतुक करत म्हटले, ज्या संयमाने सूर्यकुमारने फलंदाजी केली त्याच कारणाने सामना मुंबईसाठी फिरवला गेला.
त्यांचा यूट्यूब चॅनेलवर बोलताना सिद्धू यांनी म्हटले, सूर्यकुमार यादवने जी फलंदाजी केली ती अविश्वसनीय होती. असे वाटले होते की, 160 धावसंख्या सुद्धा महत्त्वाची ठरेल. पण सूर्यकुमार यादवने त्या खेळपट्टीवर महत्त्वाची कामगिरी निभावली, त्याने त्या खेळपट्टीवर जे धैर्य आणि संयम दाखवला ते खूप अविश्वसनीय होते. सूर्याने शानदार कामगिरी केली.
ते पुढे म्हणाले, सूर्यकुमार यादवने खेळपट्टी समजून घेऊन शांत पद्धतीने फलंदाजी केली. तो नेहमीच त्याच्या फलंदाजीदरम्यान वेगळे शॉट खेळायला जातो. ते त्याने शांत पद्धतीने आणि सरळ पद्धतीने खेळले. हे त्याच्याकडून खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते. त्याने दाखवून दिले की, अनुभवाने कसा सामना फिरवला जाऊ शकतो. सूर्यकुमार शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्याने एका षटकात सामना फिरवला.
दिल्ली विरुद्ध जिंकून मुंबई प्लेऑफमध्ये (playoff) पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे. आता गुजरात, बंगळुरू, पंजाब आणि मुंबई या चार संघांमध्ये आयपीएल 2025 (IPL 2025) ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.






