सध्या सुरू असलेल्या पुरुषांच्या आयसीसी टी२० विश्वचषक यूरोप क्वालिफायरमध्ये फ्रांस संघाकडून युवा सलामीवीर गस्तव मकीन याने दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे. गस्तवने सोमवारी (२५ जुलै) स्विझरलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा क्रिकेटपटू बनला आहे.
गस्तवने (Gustav Mckeon) आयसीसी टी२० विश्वचषक यूरोप क्वालिफायरच्या (ICC T20 World Cup Europe Qualifier) ब गटातील फ्रांस विरुद्ध स्विझरलँड संघातील सामन्यात ही लक्षवेधी कामगिरी केली आहे. फ्रांसकडून सलामीला फलंदाजीला येत त्याने ६१ चेंडूत १०९ धावांची प्रशंसनीय शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि ५ चौकारही मारले. अर्थात फक्त बाउंड्रीनी त्याने ७४ धावा जोडल्या.
अशाप्रकारे तरुण वयात शतक झळकावत त्याने अफघाणिस्तानचा हजरतुल्लाह जजाई याचा विक्रम मोडला आहे. जजाईने २० वर्षे ३३७ दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध शतक ठोकत त्याने या विक्रमाला गवसणी घातली होती. परंतु आता गस्तवने (Youngest Cricketer To Score T20I Century) वयाच्या १८ वर्षी आणि २८० दिवसांचे असताना हे विलक्षण काम करून दाखवले आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारे सर्वात युवा क्रिकेटर-
१८ वर्ष २८० दिवस: गस्तव मकीन वि. स्विझरलँड (२०२२)
२० वर्ष ३३७ दिवस: हजरतुल्लाह जजाई वि. आयर्लंड (२०१९)
असे असले तरीही, गस्तव शतकी खेळीनंतरही त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्याव्यतिरिक्त फ्रांसकडून कोणत्याही फलंदाजाला साध्या २० धावाही करता आल्या नाहीत. परिणामी फ्रांसने १५७ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात स्विझरलँडकडून सलामीवीर आणि कर्णधार फहीम नाझीरने अर्धशतक केले. तसेच अली नय्यरने नाबाद ४८ धावांची खेळी खेळत संघाला शेवटच्या चेंडूवर १ विकेट राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बापू बधू सारू छे’, मॅच विनर अक्षर पटेलचे कर्णधार रोहितकडून गुजराती भाषेत कौतुक
शॉकिंग! मुंबईत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या, २ तास जागेवरच होता पडून
धक्कादायक! स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाच्या सर्व सदस्यांचा एकदाच राजीनामा, कारण आहे गंभीर