वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारतीय संघाची अखेरची मालिका टी20 मालिकेच्या रूपाने सुरू आहे. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने एक बदल केला.
A look at our Playing XI for the 2nd T20I 👇👇
Live – https://t.co/mhKN4Dq5T0…… #WIvIND pic.twitter.com/oZQdC7tnzj
— BCCI (@BCCI) August 6, 2023
त्रिनिदाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला चार धावांनी पराभूत व्हावे लागले होते. 150 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरलेला. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचे मोठे आव्हान हार्दिक पंड्या व संघासमोर असेल. या सामन्यासाठी यजमान संघात एकही बदल केला गेला नाही. मात्र, भारतीय संघाला एक बदल करणे भाग पडले. प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव सरावा दरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे, रवी बिश्नोई याला संधी देण्यात आल्याचे कर्णधार हार्दिकने सांगितले.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): कायल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार
(Guyana T20I India Won Toss And Elected Batting First Bishnoi Replace Kuldeep Yadav)
महत्वाच्या बातम्या-
आगामी टी20 विश्वचषकाबद्दल रोहितने दिली लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला..
वर्ल्डकपसाठी पाकिस्तानची तयारी सुरू! ‘या’ खास व्यक्तीला केले पाचारण