हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना उद्या 31 जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्याने भारतीय संघ हा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्याचा हा 200वा वन-डे सामना असणार आहे.
हॅमिल्टनच्या या मैदानावर भारताचा विक्रम वाईट असल्याने रोहितसाठी उद्याचा सामना एक परिक्षाच असणार आहे.
भारत येथे एकूण 9 वन-डे सामने खेळला आहे. त्यातील फक्त 3 सामन्यातच भारत विजयी ठरला तर 6 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
2003ला न्यूझीलंड दौऱ्यावर आल्यावर भारताने येथे 7वन-डे सामन्यातील शेवटचा सामना खेळला होता. त्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 122च धावा केल्या होत्या. जी या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या ठरली होती.
या मैदानावर वन-डे सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम विंडीज संघाच्या नावावर आहे. त्यांनी 2014मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 4 विकेट्स गमावताना 364 धावा केल्या होत्या.
सध्या सुरू असलेली मालिका भारताने आधीच 3-0ने जिंकली असली तरी या चौथ्या सामन्यात संघात बदल दिसण्याची शक्यता आहे. तर रोहितचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.
भारताने तब्बल 10 वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकली आहे. 2008-09मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 5 वन-डे सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली होती. यातील चौथा सामना हॅमिल्टनमध्ये झाला होता. हा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 84 धावांनी जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान विश्वचषकात वेगळ्या ग्रुपमध्ये
–२०२० टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पहा येथे
–तब्बल १६ महिन्यांनी किंग कोहली ठरला या गोष्टीत दुर्दैवी