इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत यॉर्कशायर आणि हॅम्पशायर या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात यॉर्कशायर संघाला सामना जिंकायची सुवर्णसंधी होती. परंतु, हा सामना अनिर्णीत राहिला. कारण यॉर्कशायर संघाला विरोधी संघातील शेवटचा एक फलंदाज बाद करता आला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चार दिवसीय सामन्याच्या शेवटच्या दिवशी हॅम्पशायर संघाला विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान मिळाले होते. परंतु या संघाचे १७७ धावांवर ९ गडी बाद झाले होते. एकवेळ असे वाटू लागले होते की, हॅम्पशायर संघ हा सामना गमावणार. परंतु, शेवटी काईल एबॉटने नाबाद ९ आणि ब्रेड विलने नाबाद ० धावांचे योगदान देत हॅम्पशायर संघाला पराभवापासून वाचवले. दोघांनी मिळून शेवटी ४६ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, एबॉटने एकूण ५१ तर वीलने २२ चेंडूंचा सामना केला. हॅम्पशायर संघाला दुसऱ्या डावात ९ बाद १७७ धावा करता आल्या.(Hampshire hold on for draw against Yorkshire video viral)
एका फलंदाजासाठी १० क्षेत्ररक्षकांचा रचला सापळा
हॅम्पशायर संघाचे दुसऱ्या डावात ९८.३ षटकातच ८ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यावेळी असे वाटू लागले होते की, हॅम्पशायर संघ हा सामना गमावणार. कारण त्यावेळी देखील ९९ चेंडूंचा खेळ शिल्लक होता. परंतु शेवटच्या दोन जोड्यांनी मैदानावर टीचून फलंदाजी केली आणि यॉर्कशायर संघाच्या तोंडून घास हिसकावून घेतला. दरम्यान शेवटच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी यॉर्कशायर संघाने फलंदाजाच्या अवतीभोवती १० क्षेत्ररक्षकांचा सापळा रचला होता.
CLOSE | A fantastic day four effort sees us secure a draw against @YorkshireCCC at @TheAgeasBowl 💪@Kyle_Abbott87 & @BradWheal – both unable to bowl earlier in the game due to injury – bat out the last 7.4 overs in fading light 🤝 pic.twitter.com/tce0N9Jl8d
— Hampshire Cricket (@hantscricket) September 2, 2021
नाईटवॉचमेनची टीचून फलंदाजी
हॅम्पशायर संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नाईटवॉचमेन म्हणून मेसन क्रेनला फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. दरम्यान त्याने हॅम्पशायर संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. त्याने १९७ चेंडूंचा सामना करत २८ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
ओमानने मुंबईविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत सामना जिंकला, अशी आहे मालिकेतील स्थिती
जार्वो आला अन् थेट पळत जाऊन बेअरस्टोला धडकला, भारताचा ब्रिटिश चाहता तिसऱ्यांदा घुसला मैदानात
जार्वो आला अन् थेट पळत जाऊन बेअरस्टोला धडकला, भारताचा ब्रिटिश चाहता तिसऱ्यांदा घुसला मैदानात