उद्यापासून (४ ऑगस्ट) भारत विरुद्ध इंग्लंड या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. अशातच नेटमध्ये सराव करत असताना मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू मयंक अगरवालच्या डोक्याला जाऊन लागला, ज्यामुळे त्याला दुखापत झाली आहे आणि तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. यापूर्वी युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल देखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा मुख्य सलामीवीर फलंदाज आहे. तसेच त्याच्यासोबत शुबमन गिल डावाची सुरुवात करायचा. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर तो दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यानंतर मयंक अगरवाल पहिल्या कसोटी सामन्यात रोहितचा सलामी जोडीदार असेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु आता तोही पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.
कोण असेल रोहितचा साथीदार?
भारतीय संघाकडे आता सलामीसाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बंगालचे नेतृत्व करणारा अभिमन्यु ईश्वरन, केएल राहुल आणि हनुमा विहारी. अभिमन्यु ईश्वरनला इंग्लंड दौऱ्यासाठी राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तो हे स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तसेच केएल राहुलला देखील या संघात स्थान दिले जाऊ शकते. असाही अंदाज व्यक्त केला जात आहे की, हनुमा विहारीला पहिल्या कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. असे झाले तर, केएल राहुल मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Hanuma Vihari can open the innings with rohit sharma in absence of Mayank Agarwal)
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धीमान साहा, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडू : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अरजन नगवासवाला
महत्त्वाच्या बातम्या-
‘येथे जिंकण्याव्यतिरिक्त काहीही नको’, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे विराटने फुंकले रणशिंग
“त्याला कसोटी मालिकेत संधी मिळू शकते”, हार्दिकचा पर्याय म्हणून रहाणेने सुचविले युवा खेळाडूचे नाव
“मला समजत नाही की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी इतके उतावीळ का आहोत?”