क्रिकेटटॉप बातम्या

“मी खूप भाग्यवान आहे की…”, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज हिटमॅनचा मोठा चाहता

भारतीय क्रिकेट संघातील सध्याची परिस्थिती काय आहे हे फक्त संघ व्यवस्थापनालाच माहिती आहे. पण टीम इंडियामधील अंतर्गत कलहाच्या अटकळींनी भारतातील क्रिकेट जगताला वेठीस धरले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून रोहित शर्माला वगळल्याने त्याच्या निवृत्तीच्या अफवांना खतपाणी मिळत होते. दरम्यान आता त्याच्या आणि प्रशिक्षक गौतम गंभीरमधील भांडणाचा विषयही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता परिस्थिती अशी आहे की कर्णधार रोहित शर्माचा पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, युवा वेगवान गोलंदाज आकाशदीपच्या मुलाखतीने या प्रकरणाला एक नवीन वळण दिले आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आकाशदीपने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल बरेच काही सांगितले आहे. तो म्हणाला, “रोहित शर्माला माझ्यावर खूप विश्वास आहे, की मी कधीही विकेट घेऊ शकतो. तो मला असेही सांगतो की मी प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्यास सक्षम आहे. जर मी विकेट घेऊ शकलो नाही, तर त्याचा संदेश असा असतो की मी दुसऱ्या टोकाकडून जबाबदारी घ्यावी आणि सामन्याचा वेग कमी करावा आणि धावांचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करावा.”

पुढे बोलताना तो म्हणाला, ‘रोहित शर्मा हा महान कर्णधार आहे. मी त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. रोहित भाई सामन्यात गोष्टी खूप सोप्या ठेवतो. तो नेहमी खेळाडूंना मदत करत असतो’.

आकाशदीपने मागीलवर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. त्याच्या पदार्पणाच्या डावात त्याने 3 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर त्याने बांगdलादेशविरुद्धच्या मालिकेत 5 विकेट्स घेतल्या. आकाशदीपने आतापर्यंत त्याच्या फलंदाजीनेही खूप प्रभावित केले आहे. तसेच त्याच्या 7 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने 15 बळी घेतले आहेत.

हेही वाचा-

युवराज सिंगची कारकीर्द संपवणारा नियम पुन्हा लागू होणार! बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये
हा संघ आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल खेळणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याची तिकिटे चक्क इतक्या रुपयांत, पीसीबीकडून रेट कार्ड जाहीर

Related Articles