---Advertisement---

द्रविडच्या ‘त्या’ योजनेमुळे विहारीला गमवावे लागले कसोटी संघातील स्थान

Hanuma-vihari
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात काही खेळाडूंना संधी मिळाली तर काही खेळाडूंना मिळाली नाही. अष्टपैलू खेळाडू हनुमा विहारी याची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली नव्हती. आता हनुमा विहारीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्याचे मोठे कारण समोर आले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरला कसोटी संघात स्थान का देण्यात आले? याबाबत सांगितले गेले.

एका वृत्तानुसार, हनुमा विहारीला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. जेणेकरून तो भारत ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिकेत जाऊन तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा असून हनुमा विहारी याने आधी तिथे जाऊन परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घ्यावे, अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यास न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत स्थान मिळाले नाही.

त्याचबरोबर युवा फलंदाज श्रेयस अय्यरचा कसोटी संघात समावेश करण्यामागे एक मोठे कारणही समोर आले आहे. वृत्तानुसार, निवडकर्ते त्याला चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या जागी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच या कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला, तेव्हा हनुमा विहारीचे नाव नव्हते आणि श्रेयस अय्यरचा समावेश होता. यानंतर विविध माध्यमे आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारत ‘अ’ संघात हनुमा विहारीचा समावेश करण्यात आला.

एका सूत्राने सांगितले की, ”प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोणत्याही मोठ्या दौऱ्यापूर्वी राहुल द्रविड ‘प्रति दौरा’ करण्याच्या बाजूने असतो. यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक मोठा संघ तयार असेल. याची दक्षिण आफ्रिकेत मदत होईल. याशिवाय पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. भारताला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीबाबत मोठी अडचण आहे. तसेच सातव्या क्रमांकावर जडेजा आणि अश्विन क्रमाने फलंदाजी करू शकतात.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---