चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीवर आल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनी येथे तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर (१० जानेवारी) ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ४०७ धावांचे डोंगरेएवढे आव्हान उभारले आहे. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारतीय संघ २ बाद ९८ धावांवर आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कसोटी स्पेशलिस्ट हनुमा विहारी खराब फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आहे. फलंदाजीतील फ्लॉप शोनंतर त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा अतिशय सोपा झेल सोडला. त्यामुळे ट्रोलर्सनी त्याला धारेवर धरले आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात ११७ धावांवरच ३ महत्त्वपुर्ण विकेट्स गमावल्या. अशात २७ वर्षीय फलंदाज विहारी संघाचा आधार बनेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र ३८ चेंडूत अवघ्या ४ धावा करत विहारी धावबाद झाला. त्यामुळे चाहते खूप नाराज झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मार्नस लॅब्यूशाने दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना विहारीने मोठी चूक केली.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डावातील ३०वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लॅब्यूशानेने बॅकवर्ड स्क्वेअरकडे साधारण शॉट मारला आणि चेंडू सरळ विहारीच्या हातात गेला. तरीही विहारीच्या हातून चेंडू निसटला आणि लॅब्यूशानेला जीवदान मिळाले. हे पाहून बुमराहने वैतागून डोके धरले. पुढे लॅब्यूशानेने जीवदानाचा फायदा घेत संघासाठी ७३ धावांची आतिशी खेळी केली.
Second ball of the day and Labuschagne gets a life!
Live #AUSvIND: https://t.co/KwwZDwbdzO pic.twitter.com/1arOlWgBjf
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
https://twitter.com/TarangDesai7/status/1348101567887511557?s=20
Only two little concerns with #Vihari
1. He keeps thinking about his drop catches while batting
2. Keeps analyzing his run outs while fielding#INDvsAUS
— Indian! (@Bebaak__Indian) January 10, 2021
https://twitter.com/mard_tweetwala/status/1348089682186305538?s=20
https://twitter.com/Jacostio/status/1348051081389953024?s=20
Breaking News ( From Gupt Sources ???? ) :
Agar agli baar #Bumrah ki bowling par Pant ya #Vihari ne catch chodda to yeh hoga ????… pic.twitter.com/JnbKb9KZ4m— Chad Bhoi ???? (Parody) (@mard_tweetwala) January 10, 2021
विहारी फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणात फ्लॉप ठरल्याने क्रिकेट रसिकांचा पारा चढला. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्यांनी विहारीवर टीकेचा भडिमार केला आहे. काहींनी तर विहारी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याच्या लायकीचा नाही, असे म्हटले आहे. तर काहींनी विहारीची फ्लॉप फलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण त्याला पुढील सामन्यातून डच्चू देण्यासाठी पुरेसे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कमालच की राव! सुरुवातीच्या पन्नास धावांसाठी खेळले ११६ चेंडू, अन् पुढच्या ३३ धावांसाठी फक्त १६
स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या भारतीयांच्या यादीत ‘हा’ गोलंदाज अव्वल
वर्णद्वेषी टिप्पणी करणार्या प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी, माजी खेळाडूने केली मागणी





