---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ‘व्वा हनुमा’, आयपीएल लिलावात मात्र ‘ना-ना’!! अनसोल्ड राहिल्यानंतर विहारीने दिली प्रतिक्रिया

On: शनिवार, फेब्रुवारी 20, 2021 1:27 PM
---Advertisement---

बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सीरिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाने ३३४ धावा करत सामना अनिर्णीत राखला होता. यात दुखापतग्रस्थ असताना देखील भारतीय कसोटीपटू हनुमा विहारीने १६१ चेंडूचा सामना करत २३ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्यानंतर चोहोबाजूंनी त्याचे कौतुक झाले होते. परंतु याच विहारीला आयपीएल २०२१ च्या लिलावात कोणत्याही संघाने स्थान दिले नाही.

या लिलावात एकूण २९२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात ८ संघासाठी ५७ खेळाडूंवर एकूण १४५ कोटींची बोली लावण्यात आली. परंतु विहारीला एकाही संघाने खरेदी नाही केले. त्याची लिलावासाठी मूळ किंमत १ कोटी इतकी होती. आता लिलावानंतर विहारीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मागील २ वर्षांपासून आयपीएल पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेला विहारी यंदा निवड होण्याच्या अपेक्षेत होते. मात्र लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली न लावले त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिला. आपण अनसोल्ड राहिल्याने समजल्यावर अवघ्या काही मिनिटातच त्याने ट्विटरवर ट्विट करत ‘लोल’ असे लिहिले. त्यापुढे हसण्याच्या ईमोजी देखील दिला. हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

२०१९ च्या आयपीएल हंगामात विहारी दिल्ली कॅपिट्लस संघातून खेळत होता. यात त्याने २ सामने खेळत अवघ्या ४ धावा केल्या होत्या. यानंतर दिल्ली संघाने त्याला रिलीज केले होते. दिल्ली संघातून खेळण्यापूर्वी २०१३ आणि २०१५ च्या हंगामात तो सनराइजर्स हैदराबाद या संघात होता. त्याने आतापर्यंत २४ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने २८४ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

किती ते दुर्दैव! एका षटकात दिले ५ षटकार अन् हिरोचा झाला झिरो, आयपीएल लिलावातही मिळाला नारळ

दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! आयपीएल सोडून देशासाठी क्रिकेट खेळणार कागिसो रबाडा?

तमिळ सुपरस्टार ‘विजय’च्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकले भारतीय क्रिकेटपटू, सोशल मीडियावर व्हिडिओने घातला धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---