वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या हंगामाची सुरुवात केली. डब्ल्यूटीसी 2023-25च्या पहिल्याच सामन्यात ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांना पदार्पणाची संधी मिळाली. येत्या काळात अजूनही काही युवा खेळाडू पदार्पण करू शकतात. पण भारताचा अनुभवी फलंदाजी अष्टपैलू हनुमा विहारी मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहेत. विहारीने याच पार्श्वभूमीवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.
हनुमा विहारी (Hanuma Vihari) जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू होता. पण डब्ल्यूटीसी 2021-23 मध्या त्याला नाहीच्या बरोबर संधी मिळाल्या. त्याला न्यूझीलंडविरुद्ध मायदेसातील कसोटी मालिकेत संघातून वगळण्यात आले. पण भारताने आगामी मालिकेत श्रीलंकन संघाचा पाहुणचार केला, तेव्हा त्याला संघात पुन्हा घेतले गेले. मायदेशात त्याने दोन कसटी आणि इंग्लंडविरुद्धची एकमात्र कसोटी खेळली. त्यानंतर मात्र तो संघातून बाहेर गेला अद्याप पुनरागमन करू शकला नाहीये. डब्ल्यूटीसी 2023-25 हंगामासाठीही त्याला संघात घेतील, याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे.
स्वतः विहारी देखील त्याला ज्या पद्धतीने अचानक संघातून बाहेर केले गेले, यामुळे सदम्यात होता. पण आता तो यातून सावरला आहे. हनुमा विहारिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय कसोटी संघातून वगळल्यामुळे तो नाराज आहे, असे सांगितले. तो म्हणाला, “मला संघात वगळण्याचे एकही कारण मला सापडले नाही. ही एकमात्र गोष्ट आहे, ज्यामुळे मला त्रास होत होता. खरंतर कुणीच माझ्याशी संपर्क साधला नाही आणि सांगितले नाही की, मला संघात कशामुळे बाहेर केले.”
विहारीने सांगितल्याप्रमाणे आतातो निवड प्रक्रियेवर संघ निवडीवर शांत राहायला शिकला आहे. विहारी म्हणाला, “यासाठी थोडा वेळ लागला. पण मी चढ उतार पाहिले आहेत आणि आता यामुळे त्रास किंवा चिंता होत नाही. मी आता माझे वैयक्तिक मद बाजूला ठेवले आहे आणि आता या गोष्टींचा जास्त तान घेत नाही. भारतीय संघात आहे की नाही, याचा आता फरक पडत नाही. जिंकण्यासाठी इतर सामनेही आहेत आणि हे ट्रॉफी जिंकण्याविषयी आहे.” (Hanuma Vihari said that the reason for exclusion from the Indian team is still not understood)
महत्वाच्या बातम्या –
दुलीप ट्रॉफी फायनल: दुसऱ्या दिवशी दक्षिण विभाग फ्रंटफूटवर, पुजारा-सूर्या फ्लॉप
स्वस्तात बाद झालेल्या स्मृतीसाठी बांगलादेशविरुद्धची तिसरी टी-20 ठरली खास, कशी ती घ्या जाणून