---Advertisement---

भारतीय खेळाडूंसमोर असेल ‘हे’ आव्हान; इंग्लंडमध्ये असलेल्या विहारीचे वक्तव्य

---Advertisement---

भारतीय संघ तब्बल 4 महिन्याच्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. परंतु, भारतीय संघ इंग्लंडला पोहोचण्याआधीच भारताचा मधल्या फळीचा फलंदाज हनुमा विहारी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेलेला होता. त्याचाही इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश आहे. या दौऱ्यात भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यांपूर्वीच विहारी इंग्लंडमधील वातावरणासोबत समरस झाला आहे.

त्यामुळे त्याने म्हटले आहे की त्याला आलेल्या अनुभवाचा उपयोग तो पुढे करेल. तसेच इंग्लंडच्या वातावरणात खेळताना येणाऱ्या आव्हानाबद्दलही त्याने सांगितले.

तो म्हणाला, ‘इथल्या वातावरणात खेळणे ही नेहमीच एक खडतर परीक्षा असते. इथे पावसासारखं वातावरण इथे मोठी भुमिका निभावत असतात, कारण जेव्हा आकाश निरभ्र मोकळे असेल तेव्हा फलंदाजी करणे खूपच सोपे होऊन जाते, त्याचवेळी जेव्हा आकाशात ढगाळ वातावरण असेल तेव्हा दिवसभर चेंडू खूप हरकत करत असतो. ह्याच समस्येचा सामना काउंटी क्रिकेटच्या हंगामाच्या सुरवातीला मला करावा लागला. मी जेव्हा इथे नवीन आलो होतो तेव्हा इथे खूपच थंडी होती आणि चेंडू खूपच कमी गतीने बॅटवर येत होता.’

स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीचा सामना करण्याविषयी तो म्हणाला की, ‘मला वाटले की मी त्या चेंडूवर फुल्ल ड्राईव्ह करू शकलो असतो. परंतु, इंग्लंडमध्ये आपल्याला प्रत्येक शॉट विचार करून खेळला पाहिजे. शॉट सिलेक्शन अतिशय महत्वाचा मुद्दा ठरत असतो. भारतात खेळताना जर फलंदाज चेंडू ड्राईव्ह करण्यात चुकला तरी तो चेंडूला पुढे ढकलून वाचू शकतो आणि पुन्हा तसाच चेंडू आला तर फलंदाज तो चेंडूवर उशिरा खेळण्याचा प्रयत्न करतो.’

पुढे त्याने सांगितलं की, ‘काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. इथे मी हे शिकलो की चेंडूला विचार पूर्वक खेळले पाहिजे. एसेक्स विरुद्धच्या माझ्या दुसऱ्या सामन्यात मी दोन डावात प्रत्येकी 30 व 50 धावा केल्या. एसेक्स गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि त्यांची गोलंदाजी देखील आक्रमक आहे, ज्यात पीटर सिडल आणि सिमोन हॅमरसारखे गोलंदाज आहेत. मला वाटते मी चांगली फलंदाजी केली परंतु, त्याला मोठ्या खेळीत परावर्तीत करायला हवं होतं.’

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटपेक्षा रोहित आहे यशस्वी कर्णधार, ‘ही’ आहेत त्यामागची ५ समर्पक कारणे

जिद्द असावी तर अशी! पाकिस्तान टी२० संघात वजनदार फलंदाजाची एंट्री, वर्षभरात घटवलं ३० किलो वजन

“टीममध्ये निवड होताच नाश्त्यावरून उठून थेट वडिलांकडे गेलो, सर्वकाही चित्रपटाप्रमाणेच होते”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---