भारतात सध्या महिलांच्या क्रिकेटलासुद्धा खूप प्रतिसाद मिळत आहे. आजकाल क्रिकेट चाहते महिलांचे क्रिकेटसुद्धा आवर्जून बघतात. २ दिवसापूर्वी झालेल्या इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला कसोटी सामन्यातसुद्धा भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी केली. आज भारतीय महिलांच्या संघातील एका खेळाडूचा वाढदिवस आहे. ही महिला खेळाडू सिनेसृष्टीतल्या अभिनेत्रींनाही सौंदर्याच्या बाबतीत मात देईल, इतकी ती सुंदर आहे. या महिला खेळाडूच नाव आहे हारलीन देओल.
हारलीनचा जन्म २१ जून १९९८ रोजी पंजाबमधल्या चंडीगड येथे झाला. हारलीन आज आपला २३वा जन्म दिवस साजरा करत आहे. हारलीनला क्रिकेटची आवड अगदी लहानपणा पासूनच होती. तिने ८ वर्षाची असतानाच आपल्या भावासोबत आणि आजूबाजूच्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी ९ वर्षाची असतानाच ती शाळेच्या संघात निवडली गेली. त्यानंतर शालेय क्रिकेटपासून तिचा प्रवास राष्ट्रीय संघापर्यंत झाला. १३ वर्षाची असताना ती हिमाचल प्रदेशला क्रिकेट खेळण्यासाठी गेली.
https://www.instagram.com/p/CPnpEhjtifB/
हारलीन अभ्यासातसुद्धा हुशार होती. दहावी आणि बारावीला तिला ८० टक्याहून अधिक गुण होते. ती एक कलाकार सुद्धा आहे. हारलीनचा मोठा भाऊ दातांचा डॉक्टर आहे. हारलीन लहान असताना हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल यांसारख्या खेळातसुद्धा भाग घेत असे. ती एक परिपूर्ण खेळाडू आहे. हारलीनला जेव्हा गल्ली क्रिकेटमध्ये मोठ्या मुलांसोबत क्रिकेट खेळत असे, तेव्हा तिच्या आजूबाजूची लोकं तिची तिच्या आईला जाऊन तक्रार करत असत. परंतु, तिला आणि तिच्या घरच्यांनी अशा तक्रारींकडे दुर्लक्ष केले.
https://www.instagram.com/p/CNr1argLqX0/
एका मुलाखतीत तिची आई सांगते की, हारलीनने क्रिकेटसाठी आम्हाला आजवर कधीही त्रास दिला नाही. ती क्रिकेट सरावासाठी स्वत:हून उठायची आणि स्वत:ची कामं स्वत:च करायची. कधी काही लागले तर, त्यावर मलमपट्टीसुद्धा स्वत:च करायची.
https://www.instagram.com/p/B7_IQLSJH7L/
हारलीनने इंग्लंड विरुद्ध भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. हारलीनने आजवर भारती संघासाठी एक एकदिवसीय सामना खेळला आहे, त्यात केवळ तिने २ धावा केल्या आणि ९ टी२० सामन्यात ११० धावा आणि ६ विकेट्स काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: …म्हणून कसोटी क्रिकेट आहे सर्वोत्तम! किवी आणि भारतीय खेळाडूंनी सांगितली कारणे
जोफ्रा बाबा की जय! विराट कोहलीच्या बाबतीत ५ वर्षांपूर्वी आर्चरने केलेलं ‘ते’ ट्वीट पुन्हा चर्चेत
‘शॉर्ट चेंडू खेळण्याची नवीन पद्धत शोधून काढ,’ माजी फलंदाजांचा अजिंक्यला उपदेश