१४ मे १९८३मध्ये एका अशा खेळाडूचा जन्म झाला, ज्याला झिंबाब्वे क्रिकेटचे भविष्य समजले जात होते. त्याच्यामध्ये अप्रतिम प्रतिभा होती. परंतु राजकारणामुळे त्याची कारकीर्दी वेळेपूर्वीच संपुष्टात आली. तो आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर करू शकला नाही. तो खेळाडू इतर कोणी नसून झिंबाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक तातेंदा तैबु आहे. आज तो आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
तैबुने (Tatenda Taibu) आपल्या क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत २८ कसोटी सामने, १५० वनडे सामने आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १५४६, वनडेत ३३९३ आणि टी२०त २५९ धावा केल्या आहेत.
तैबुने केवळ १६ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तसेच तो १८ वर्षांचा असताना वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तैबुचे यष्टीरक्षण कमालीचे होते. तो कमी वेळातच एक महान यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक एँडी फ्लावरचा उत्तराधिकारी बनला होता.
पदार्पणाच्या केवळ ३ वर्षांनंतर केवळ २१ व्या वर्षी तैबु झिंबाब्वे संघाचा कर्णधार बनला होता. आजही तो जगातील राशिद खाननंतरचा दुसरा सर्वात युवा कसोटी कर्णधार आहे.
हे सर्व चांगले सुरु असताना एक ग्रहण लागले. झिंबाब्वेचे माजी राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे (Robert Mugabe)नी आपल्या देशाचे क्रिकेटला नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मुगाबे यांनी झिंबाब्वेच्या संघात कोटा सिस्टीम सुरु केली होती.
तेव्हा या सिस्टीमचा सर्व खेळाडूंनी विरोध केला होता. काही काळात कर्णधार हिथ स्ट्रीक यांना कर्णधारपदावरून हटविण्यात आले आणि इतर दिग्गज खेळाडूंसारख्या म्हणजेच एँडी फ्लावर, ग्रँट फ्लावर यांना जीवेमारण्याची धमकी दिली. यामुळे या सर्व क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हे तर आपला देशही सोडला.
तैबुला एका खूप कमकुवत संघाचे कर्णधारपद मिळाले होते. तसेच २००५मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या झिंबाब्वेला खूप लाजिरवाणा पराभव मिळाला होता. यानंतर तैबुने झिंबाब्वे क्रिकेट बोर्डावर अनेक आरोप केले होते. या पत्रकार परिषदेनंतर तैबुला मुगाबे सरकारकडून जीवे मारण्याची धमकी (Death threat) मिळाली. त्यामुळे तैबुने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
निवृत्ती घेतल्यानंतर तैबुने दक्षिण आफ्रिका क्रिकेट क्लब खेळले आणि त्यानंतर २ वर्षांनी त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. २००८मध्ये तैबुला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) विकत घेतले आणि त्याने झिंबाब्वेचे सामने सोडून आयपीएलची निवड केली. यानंतर झिंबाब्वेने त्याच्यावर १० सामन्यांची बंदी घातली होती.
तैबुने २०११ मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आरोप केला की, झिंबाब्वे क्रिकेट बोर्ड (Zimbabwe Cricket Board) खेळाडूंच्या हितासाठी काही करत नाही. यानंतर तो एका चर्चमध्ये पादरी बनला. अशाप्रकारे त्याची कारकीर्द केवळ २९ व्या वयात संपुष्टात आली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३ असे भारतीय खेळाडू, ज्यांना खराब कामगिरीमुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले
-युवराज म्हणतो, आयपीएलमधील हा संघ खूपच खराब
-मी आजपर्यंत धोनीला कधीही विचारलं नाही की मला संघातून का काढलं?