ऑस्ट्रेलियाचा धाकड सलामीवीर डेविड वॉर्नर याचे भारताप्रती असलेले प्रेम लपून राहिलेले नाही. तो सातत्याने हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमातील गाणी, एखादा सीन किंवा एखाद्या अभिनेत्याची नक्कल करत भारतीयांची मने जिंकत असतो. मध्यंतरी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अर्थात 15 ऑगस्टला शुभेच्छापर पोस्ट टाकत व्वाह व्वाह लुटली होती. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने भारतीयांच्या हृदयावर वार केला आहे.
सध्या भारतभरात गणेश चतुर्थीची (Ganesh Chaturthi) धामधूम सुरू आहे. अशात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू वॉर्नर (David Warner) हा देखील गणपती बाप्पांच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व भारतीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतात वॉर्नरची चांगली फॅन फॉलोविंग आहे. तोदेखील येथील संस्कृतीशी चांगलाच जोडला गेला आहे. अशात क्रिकेटमध्ये व्यस्त असतानाही वॉर्नरने गणपती बाप्पांच्या आगमनाची खास पोस्ट शेअर करत कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. वॉर्नरदेखील संघासोबत झिम्बाब्वेला गेला आहे. यादरम्यान 31 ऑगस्ट रोजी वॉर्नरने गणेश चतुर्थीचे औचित्य साधून फोटो शेअर केला आहे. या फोटोत वॉर्नर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तो ऑस्ट्रेलिया संघाची जर्सी घालून हात जोडून बाप्पांना नमन करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की,
‘माझ्या सर्व मित्रांना हॅप्पी गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा.’
https://www.instagram.com/p/Ch6Xr_trdq9/?utm_source=ig_web_copy_link
घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी
भारतात गणेश चतुर्थीची तयारी प्रत्येक कानाकोपऱ्यात सुरू आहे. या दिवशी भक्तगण त्यांच्या घरी गणपती आणतात आणि त्याची पूजा करतात. 11 दिवस गणपती घरी राहातो. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव चालतो. यादरम्यान दररोज सकाळी, संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. गणपतीला मोदकांचा प्रसाद चढवला जातो. अनंत चतुर्थीदिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच
‘मध्यंतरी मी मेल्याच्याही बातम्या आल्या होत्या…’, पत्रकाराला मिळाले भारतीय खेळाडूकडून भन्नाट उत्तर
‘हाँगकाँगचा बाबर’ भारतासाठी ठरणार कर्दनकाळ! नावावर आहे मोठा विक्रम, रोहितही नाही आसपास