भारतावर विश्वचषकातील पहिला विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर अजूनही त्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. या आनंदाच्या भरात त्याची भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्याबरोबर चांगलेच ट्विटर वॉर रंगले. त्यानंतर हरभजनने त्याला चांगलेच फटकारले. त्याने आमीरला फिक्सर आणि खेळावरील डाग असे म्हटले. २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापासून शोएब अख्तर आणि मोहम्मद आमीर हरभजनला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते.
हरभजन सिंगने ट्विटला समर्पक प्रत्युत्तर दिल्यावर बिथरलेल्या आमीरने वैयक्तिक कमेंट करण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या भज्जीने त्याला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या फिक्सिंगची आठवण करून दिली. यानंतर आमीरची बोलती बंद झाली. मात्र, तो आपल्या काही पाकिस्तानी पत्रकारांच्या मदतीने हरभजनला ट्रोल करण्याचा नापाक प्रयत्न करत राहिला.
तो खेळावरील डाग
एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन आमीरविषयी म्हणाला,
“आमीर हा १०-१२ कसोटी खेळणारा खेळाडू आहे. त्याची विश्वासार्हता काय आहे? आमीरने आपल्या देशाला विकले आहे. त्याच्यासारखे लोक खेळावरील डाग आहेत. त्याच्यासारख्या लोकांशी बोलायचे म्हणजे स्वतःवरच चिखल उडवून घेण्यासारखे आहे.”
शोएब अख्तरविषयी तो म्हणाला, “आम्ही बराच काळ एकमेकांविरुद्ध खेळलो. आम्ही एकत्र अनेक शो केले आहेत. आमच्यात नेहमीच मजामस्ती सुरू असते. आम्ही चांगले मित्र आहोत.”
आमीरने केली होती स्पॉट फिक्सिंग
सन २०१० मध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आमीरने स्पॉट फिक्सिंग केली होती. २६ ते २९ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा डाव आणि २२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आमीरने मुद्दाम नो बॉल टाकलेला. दोषी आढळल्यावर आमीर सहा महिने इंग्लंडमध्ये तुरुंगात होता. त्यानंतर त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून व्यावसायिक टी२० लीग खेळण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/sania-mirza-father-compared-shoaib-malik-and-ms-dhoni/
विंडीजचा संघ करणार जरबदस्त पुनरागमन! आयपीएलमध्ये चमकलेल्या ‘या’ धाकड अष्टपैलूला दिलीय संधी