---Advertisement---

मनोज तिवारीला मंत्रीपदाच्या शुभेच्छा देताना हरभजनने केले धक्कादायक विधान, लगेच हटवले ट्विट

On: शुक्रवार, मे 14, 2021 6:53 PM
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याला पश्चिम बंगालच्या राज्य सरकारमध्ये क्रीडा व युवा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाने पुन्हा एकदा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २०० हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन केले. टीएमसीच्या वतीने यावेळी मनोज तिवारी यानेही निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. मनोज तिवारी याला त्याच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच मंत्री होण्याची संधी मिळाली. मात्र, या दरम्यान, भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने वादग्रस्त ट्विट करून मनोज तिवारी याला टोमणे मारल्यामुळे खळबळ उडाली.

हरभजनने केले होते असे ट्विट
भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंग याने मनोज तिवारीचे अभिनंदन करताना एक ट्विट केले. त्याने लिहिले, ‘अभिनंदन मनोज तिवारी. तुझ्या करियरमध्ये घडले तसे कोणत्याही मुलासोबत होऊ देऊ नको. देव तुला आशीर्वाद देईल! शुभेच्छा.’
कदाचित थोड्या वेळाने हरभजन सिंग याला वाटले की, त्याच्या ट्विटवरून काहीतरी वाद होईल. यामुळे त्याने आपले ट्विट डिलीट केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. काही चाहत्यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले होते.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालच्या प्रतिनिधित्व केलेल्या मनोज तिवारीने भारतीय संघासाठी १२ वनडे व ३ टी२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या अखेरच्या वनडे सामन्यात शतक झळकावले होते. परंतु, त्याला त्यानंतर पुन्हा संधी मिळाली नाही.

शिबपूरमधून लढवली निवडणूक
सध्या ३६ वर्षाच्या असलेल्या तिवारीने विधानसभा निवडणुकांआधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने शिबपूर येथून निवडणूक लढवताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रतीन चक्रवर्ती यांचा ३२००० पेक्षा जास्त मतांनी पराभव करत राजकीय आखाड्यात विजयी सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केली करारबद्ध खेळाडूंची यादी, या दोघांना मिळाली प्रथमच संधी

कर्णधारपदावरून हटविल्यानंतर अशी होती वॉर्नरची प्रतिक्रिया, प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

मायकेल वॉनने पुन्हा ओकली गरळ, विराटबाबत केले वादग्रस्त वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---