दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता मालिकेतील अंतिम सामना रविवारी ( २३ जानेवारी) रोजी पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ कुठल्याही परिस्थितीत व्हाईटवॉश होऊ न देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) भाष्य केले आहे.
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh statement) आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “जेव्हाही संघातील फिरकीपटू किंवा मध्यक्रमातील इतर गोलंदाज १५ ते ४० षटकांदरम्यान गडी बाद करण्यात अपायशी ठरतात, त्यावेळी सामना आपल्या हातातून जात असतो. मला तर वाटते की, भारतीय संघाने या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे की, कुठला गोलंदाज भारतीय संघाला गडी बाद करण्यात मदत करू शकतो. जर तो ३ गडी बाद करून देत असेल. तर ८ षटकात ६० किंवा ९ षटकात ७० धावा दिल्या तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये गडी बाद करत नसाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही.”
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
तसेच तो पुढे म्हणाला की, “शेवटचा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण तुम्ही एका स्पर्धा खेळत आहात तुम्हालाही माहीत आहे की, शेवटचा सामना जिंकल्यावर किती आनंद होतो. मला आशा आहे की, भारतीय संघ बदल करेल. गोलंदाजी क्रमात असा काही बदल केला पाहिजे, जो गडी बाद करून देऊ शकतो.”
या मालिकेतील दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी ३३.३७ च्या सरासरीने ८ गडी बाद केले आहेत. तर भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांना या दोन्ही सामन्यात १११ च्या सरासरीने केवळ २ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
नमन ओझाची झंझावाती शतकी खेळी; लिजेंड्स लीगचा पहिला शतकवीर होण्याचा मिळविला मान
राज बावाने तोडला धवनचा १८ वर्ष जुना विश्वविक्रम! युवराजशी आहे खास नाते
हे नक्की पाहा: