भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका खेळण्यासाठी बांग्लादेश संघ भारत दाैरा करणार आहे. सध्या बांग्लादेश संघ पाकिस्तान दाैऱ्यावर आहे. दरम्यान बांग्ला संघ भारतात येण्यापूर्वी टीम इंडियाचा माजी फिरकीपटूूने भारतीय क्रिकेट संघाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
बांग्लादेश संघ पाकिस्तान दाैऱ्यावर शानदार कामगिरी करत आहे. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशने यजमान पाकिस्तान संघाला 10 विकेट्सने हरवले आहे. बांग्लादेश संघाची कामगिरी पाहून आता भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने रोहित आणि कंपनीला मोलाचा सल्ला दिला आहे.
हरभजन सिंग म्हणााला- “भारत विरुद्ध बांग्लादेश ही एक उत्तम मालिका होणार आहे. भारतीय संघ खूप सक्षम आहे. मात्र, आपण बांग्लादेशला हलक्यात घेऊ शकत नाही. पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले आहे. कधी कधी लहान संघही चांगली कामगिरी करतात.”
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. तर दुसरा सामना 1 ऑक्टोबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत टीम इंडियाला आपल्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी हे सर्व सामने टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.
अलीकडेच जय शहांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याबद्दल हरभजनने जय शाहचे अभिनंदन केले आहे. भज्जी म्हणाला “आयसीसीचे अध्यक्ष बनल्याबद्दल मी जय शहा यांचे अभिनंदन करतो. जेव्हा जेव्हा एखादा भारतीय आयसीसीचा अध्यक्ष होतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. त्याने इतर देशांच्या क्रिकेटलाही जशी चालना दिली आहे तशीच चालना त्यांनी भारतीय क्रिकेटला द्यावी असे मला वाटते.”
हेही वाचा-
राहुल द्रविडच्या मुलाचा टीम इंडियात प्रवेश; ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा
यूएस ओपनमध्ये आणखी एक अपसेट, गतविजेता नोवाक जोकोविच तिसऱ्या फेरीतूनच बाहेर
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत एकही भारतीय नाही!