आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारत श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्याची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 27 जुलैला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी20 सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या झालेल्या निवडीवर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) युझवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या खेळाडूंना संघातून का वगळलं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अभिषेक शर्माला टी20 संघातून वगळणे हा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला होता. कारण त्यानं नुकतेच झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केलं आणि दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावलं. तरीही श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान मिळालं नाही. तर टी20 विश्वचषकाचा भाग असलेल्या चहललाही श्रीलंका दौऱ्यासाठी वगळण्यात आलं आहे.
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा (Sanju Samson) केवळ टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी सॅमसनची भारतीय संघात निवड झाली नाही. हरभजननं सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, “श्रीलंका दौऱ्यासाठी युझवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा भारतीय संघाचा भाग का नाहीत हे समजणं कठीण आहे.”
Hard to understand why @yuzi_chahal @IamAbhiSharma4 @IamSanjuSamson are not part of the Indian Team for Sri Lanka 🙄
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 19, 2024
भारतीय संघाबद्दल बोलायच झालं तर श्रीलंका दौऱ्यावर टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) देण्यात आली आहे. तर 2 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर सन पटेल, वॉशिंग , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग , रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर! कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करतील या 3 आयपीएल फ्रँचायजी
एकच मन किती वेळा जिंकशील स्मृती! भारतीय सलामीवीर मंधानाचं जगभरात होतंय कौतुक
“त्यांची कारकीर्द…” रोहित-विराटबद्दल भारताच्या गोलंदाजानं केलं मोठं वक्तव्य