टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर ही नामुष्की आली. विश्वचषकात खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचे पुढील लक्ष मायदेशात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी व टी२० मालिकेवर असेल. त्याचवेळी भारत अ संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दोन्ही दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, या संघ निवडीवर दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने आक्षेप नोंदविला आहे.
हरभजनने केले असे ट्विट
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी प्रमुख भारतीय संघाची व दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघांची घोषणा मंगळवारी (९ नोव्हेंबर) करण्यात आली. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना प्राधान्य दिले गेले. तसेच काही वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले. या दोन्ही संघांमध्ये पंजाबचा अनुभवी सलामीवीर मनदीप सिंग याला स्थान न दिले गेल्याने हरभजन निराश झाला. त्याने मनदीपच्या आकडेवारीची छायाचित्रे शेअर करत ट्विट करताना लिहिले,
‘आणखी एका अव्वल खेळाडूला मनदीप सिंग याला संधी मिळाली नाही. भारतीय निवड समितीने देशांतर्गत क्रिकेट व त्यातील आकडेवारीला देखील तितकेच प्राधान्य द्यायला हवे. मागील हंगाम कोरोनामुळे खेळला गेला नाही. तुम्ही मनदीपची आकडेवारी पाहू शकता.’
Another top player not getting his dues @mandeeps12 forget team India not even in India A.selectors need to see some domestic matches records or else what’s th point having Ranji seasons.check his stats 👇last domestic season played.due to corona no cricket in 20/21 #shocking pic.twitter.com/UotDWxux11
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 9, 2021
हरभजनने आणखी एक ट्विट करत सौराष्ट्राचा अनुभवी फलंदाज शेल्डन जॅक्सनलि शश संधी नाकारली जात असल्याबाबत दुःख व्यक्त केले. तसेच भारतीय संघात पुनरागमन केल्याबद्दल फिरकीपटू युजवेंद्र चहल याचे अभिनंदन केले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघ-
प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडीक्कल, सर्फराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), के गॉथम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी , उम्रान मलिक, इशान पोरेल, अरझान नागवासवाला