---Advertisement---

विराट अन् रोहित सारखाच भविष्यात ‘हा’ खेळाडू करणार चाहत्यांच्या मनावर राज्य, भज्जीची भविष्यवाणी

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 1:03 PM
Harbhajan-Singh
---Advertisement---

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाने (ZIMvsIND) केएल राहुलच्या नेतृत्वाखाली यजमान संघाला क्लीन स्विप केले आहे. भारताने या दौऱ्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका ३-० अशी जिंकली आहे. भारताचा हा सलग तिसरा वनडे मालिका विजय ठरला. झिम्बाब्वे दौऱ्यात शुबमन गिलने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तर भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्याची तुलना दिग्गजांशी केली आहे.

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill)याची तुलना रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल यांच्याशी केली आहे. त्याचबरोबर हरभजनने गिल हा भविष्यात भारताचा कर्णधार देखील बनू शकतो, असे विधानही केले आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजनने म्हटले, “शुभमन गिलची फलंदाजी गुंतागुतींची नसून सुटसुटीत आहे. तो योग्य शॉट्स निवडतो. त्याच्या  फलंदाजीची गुणवत्ता सध्याच्या भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यासारखीच आहे. तो फलंदाजी करताना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.”

“मी जेव्हा २०१७ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाचे नेतृत्व करत होतो, तेव्हा मला संघनिवडकर्त्यांनी गिलबाबत सांंगितले होते. त्यांनी मला तो किती प्रतिभावंत आहे हे पण सांगितले होते. जर तो उत्तम खेळाडू आहे, तर त्याला संघात घ्यायला माझी काही हरकत नाही असे उत्तर मी संघनिवडकर्त्यांना दिले होते,” असेही हरभजन यावेळी म्हटले आहे.

गिलने हरभजनचा विश्वास कायम राखत दुसऱ्याच सामन्यात आसाम विरुद्ध १२१ धावा केल्या. त्याला पुढे रणजी ट्रॉफीसाठीही पंजाब संघात जागा मिळाली. त्याने दुसऱ्याच सामन्यात १२९ धावा केल्या.

गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने सोमवारी (२२ ऑगस्ट) झिम्बाब्वे विरुद्ध १३० धावांची खेळी केली. तसेच त्याने वेस्ट इंडिज विरुद्धही ३ सामन्यांत १०२.५०च्या सरासरीने २०५ धावा केल्या होत्या. तर झिम्बाब्वे विरुद्धच्या ३ सामन्यांत १२२.५०च्या सरासरीने २४५ धावा केल्या. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे तो दोन्ही दौऱ्यात मालिकावीराचा मानकरी ठरला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चहलच्या अनुभवापेक्षा बिश्नोईची गुगली भारी!’ वाचा काय सांगते आकडेवारी
विराट की बाबर! आशिया चषकात कोण ठरणार सर्वोत्तम? जाणून घ्या आकडेवारी
आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---