भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो. सामना आयपीएलमधील असो किंवा आंतरराष्टीय, विराटची बातच न्यारी. याच विराटबद्दलच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने उजाळा दिला आहे. हरभजनने आरसीबी विरुद्ध झालेल्या सामन्याची आठवण करुन दिली आहे. तसेच विराट मोठा स्टार होईल याची जाणीव भज्जीला तेव्हाच झाल्याने त्याने सांगितले होते.
हरजनने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2020 मधून आपले नाव मागे घेतले आहे. तो आयपीएलमध्ये सीएसकेचा भाग होता. सुरेश रैनापाठोपाठ आयपीएल २०२०मधून नाव मागे घेणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटर ठरला आहे.
हरभजनलाने २००८ आयपीएल मधील पहिल्या सामन्याबद्दल (मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात विराट कोहलीने महान अष्टपैलू क्रिकेटपटू सनथ जयसूर्याच्या चेंडूवर षटकार ठोकला होता.
या सामन्याबद्दल बोलताना भज्जी म्हणाला, “आयपीएलच्या लिलावापूर्वी मी मुंबईकर प्रशिक्षक लालचंद राजपूतांकडून विराटचे नाव ऐकले होते. त्यात पहिल्याच सामन्यात मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतो आणि सचिन पाजी संघाबाहेर बसले होते. विराट कोहली खेळपट्टीवर आला आणि त्याने जयसूर्यासारख्या कसलेल्या खेळाडूच्या चेंडूवर षटकार ठोकला होता.”
स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम ‘आयपीएल मेमरीज’ मध्ये हरभजन सिंग पुढे म्हणाला, “जयसूर्यासारखा महान खेळाडू त्याला गोलंदाजी करीत आहे याची त्याला भीती वाटत नव्हती. हा मला भविष्यातील स्टार आहे याची जाणीव तेव्हाच झाली होती.”
एकेवेळचा भज्जीचा संघसहकारी इरफान पठाणही विराट कोहलीबद्दल म्हणाला, “जेव्हा जेव्हा मी विराटला आयपीएलमध्ये पाहिले तेव्हा तो या खेळाचा मैदानावर व मैदानाबाहेर घेत असलेला आनंद मी जवळून पाहिला. त्याने कायम क्रिकेट कारकिर्दीलाच प्राधान्य दिले. कोहलीची चांगली गोष्ट म्हणजे तो क्रिकेट नेहमीच गांभिर्याने घेतो. म्हणूनच तो जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.”
विराट कोहली पहिल्यापासून आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाकडून खेळत आहे. तब्बल १२ हंगामात एकही विजय मिळवू न शकलेली विराट सेना यावेळी पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात होईल. यावर्षी कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जात असून अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे.