---Advertisement---

कोहलीच्या आरसीबीवर खूप रागावला होता धोनी, माजी खेळाडूने सांगितली आतली गोष्ट

RCB vs CSK
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मैदानावरील त्याच्या संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला ‘कॅप्टन कूल’ नावाने देखील ओळखले जाते. पण धोनीला राग येताना पाहिलेले खेळाडू फार कमी आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणारा माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) देखील अशाच खेळाडूंपैकी एक आहे. आता हरभजनने धोनीच्या रागाबद्दल खुलासा केला आहे. ज्याला पाहून धोनीचे चाहतेही थक्क होतील.

ही गोष्ट (18 मे 2024) रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामन्याबद्दल आहे. साखळी फेरीतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना होता आणि विशेषत: प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जिवंत ठेवण्यासाठी तो सामना जिंकणे दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचे होते. पण आरसीबीने 27 धावांनी चेन्नईचा धुव्वा उडवला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करतात, परंतु त्या सामन्यानंतर धोनी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये परतला होता.

रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) सांगितले की, “आरसीबीच्या विजयानंतर एमएस धोनीचा राग शिगेला पोहोचला होता. रागामुळे धोनीने बंगळुरूच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच मैदान सोडले होते. धोनीने रागाच्या भरात टीव्ही देखील तोडला होता.”

महत्त्वाच्या बातम्या-

माजी दिग्गजाने कोहली-बाबरची तुलना फेटाळली, म्हणाला….
‘मला स्वत:चा अभिमान’, 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याने जडेजाची प्रतिक्रिया
कोहली की रूट? न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---