---Advertisement---

‘चाळीस वर्षांचा झालोय, पण स्वत:ला सिद्ध करुन दाखवायची गरज…,’ भज्जीचे टिकाकारांना जबरदस्त प्रत्युत्तर

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 11:52 AM
Harbhajan-Singh
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे. यंदाचा आयपीएल हंगाम भारतातच होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी जोरदार सरावाला सुरुवात देखील केली आहे. अशात या स्पर्धेपूर्वी वयाच्या चाळिशीत असलेल्या हरभजन सिंगच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र आता आपल्यावर टिका करणाऱ्यांना हरभजन सिंगने सडेतोड उत्तर दिले आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरभजनने पुढील २ वर्षे चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच टीका करणाऱ्यांकडून, हरभजन सिंग का खेळत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर हरभजन सिंगने सडेतोड उत्तर दिले आहे.

हरभजनने एका मुलाखतीत म्हटले की, “खूप लोक असा विचार करतात की, मी का खेळत आहे. अरे भाऊ, ही माझी विचारसरणी आहे. मला वाटते मी अजून खेळू शकतो, तर मी खेळणार. मला आता कोणालाही काही सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. चांगला खेळ खेळावा आणि मैदानावरील खेळाचा आनंद घ्यावा असा माझा मानस आहे. मला अजूनही क्रिकेट खेळून समाधान मिळते. मी स्वत:साठी निकष निश्चित केले आहेत आणि मी त्यांना न मानल्यास मी स्वतःलाच दोषी ठरवेल, दुसर्‍या कोणालाही नाही. त्यानंतर मी स्वत: ला प्रश्न विचारतो की मी पुरेसे प्रयत्न केले आहेत का.”

मी अजुनही फिट आहे
फिटनेससंदर्भात विचारले असताना हरभजन म्हणाला की, “होय, मी आता २० वर्षांचा नाही आणि मी पूर्वीच्या सवयीप्रमाणे सराव करणार नाही. मी ४० वर्षांचा झालो आहे आणि मला माहित आहे की, मी अजुनही फिट आहे. या स्तरावर यशस्वी होण्यासाठी मला जे करावे लागेल ते निश्चितपणे करेल”

आयपीएल २०२० मधून घेतली होती माघार
आयपीएल २०२० स्पर्धा कोरोणामुळे युएई मध्ये खेळवण्यात आली होती. त्यामुळे हरभजनने या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याने कुटुंबाची काळजी वाटत होती म्हणून माघार घ्यायचे ठरवले होते. तसेच सुरेश रैनाने देखील आयपीएल २०२० मधून माघारी घेतली होती. याचा फटका चेन्नई संघाला बसला होता. चेन्नई संघ आयपीएल २०२० मध्ये ७ व्या क्रमांकावर होता.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अनुभवी अमित मिश्रा बजावणार ‘ही’ मोठी भूमिका

कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले विदेशी कर्णधार

युवा शिलेदार सज्ज, सीनियरच्या निवृत्तीनंतर फरक पडणार नाही; ३४० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचे मत 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---