भारतात सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. यात या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिक याचाही समावेश आहे. त्याने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नुकतेच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) कौतिक करताना त्याला आगामी टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघात (Team India) स्थान मिळायला हवे, असे मत मांडले आहे. कार्तिकने यष्टीरक्षणाबरोबरच फिनिशरची भूमिका बेंगलोरसाठी (RCB) निभावली आहे. तसेच तो भारतीय संघातील पुनरागमनासाठी चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. यापूर्वी तो शेवटचे भारताकडून २०१९ च्या विश्वचषकात खेळला आहे. त्यानंतर त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
हरभजन सिंग स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, ‘दिनेश कार्तिकने बेंगलोरसाठी शानदार कामगिरी केली आहे. तो ऑफ साईडच्या तुलनेत लेग साईडला खूप चांगला खेळतो. पण, मला वाटते की, तो एकूणच चांगला खेळ करतो. माझ्यासाठी जर कोणी पूर्ण आयपीएलमध्ये फिनिशरची चांगली भूमिका कोणी निभावली असेल, तर तो दिनेश कार्तिक आहे. जर मी निवडकर्ता असतो, तर मी त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी नक्कीच संधी दिली असती. तो भारताचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून या संधीसाठी पात्र आहे.’
तसेच हरभजन असेही म्हणाला की, टी२० विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून हार्दिक पंड्याबरोबर दिनेश कार्तिकची जोडी चांगली चालू शकते. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.
दिनेश कार्तिक तुफान फॉर्ममध्ये
दिनेश कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) १३ सामन्यांत ५७ च्या सरासरीने आणि जवळपास १९२ च्या स्ट्राईकरेटने २८५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो या १३ सामन्यांपैकी ८ सामन्यांत नाबाद राहिला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पाटिदारच्या गगनचुंबी षटकाराने राडा, स्टेडिअममध्ये बसलेल्या काकांचं फुटलं डोकं, Video व्हायरल
रोहितसेनेविरुद्धच्या पराभवानंतरही एमएस धोनीचे मन जिंकणारे कृत्य, मुंबईच्या सदस्यांना दिले खास गिफ्ट
रबाडा @200! बेंगलोरविरुद्धच्या ३ विकेट्ससह मलिंगा, गुलला पछाडत ‘या’ विक्रमात गाठले तिसरे स्थान