Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटिदारच्या गगनचुंबी षटकाराने राडा, स्टेडिअममध्ये बसलेल्या काकांचं फुटलं डोकं, Video व्हायरल

पाटिदारच्या गगनचुंबी षटकाराने राडा, स्टेडिअममध्ये बसलेल्या काकांचं फुटलं डोकं, Video व्हायरल

May 14, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Rajat-Patidar-six-hit-a-fan

Photo Courtesy: Twitter


मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (१३ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. हा सामना पंजाब किंग्सने ५४ धावांनी जिंकला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने विजय मिळवत आपले प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान आणखी मजबूत केले आहे. पण, याच सामन्यादरम्यान एक गंभीर घटनाही पाहायला मिळाली. 

झाले असे की, पंजाबने बेंगलोरसमोर २१० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटिदार पाठलाग करत असताना ९ व्या षटकात गंभीर घटना घडली. हे षटक पंजाबकडून हरप्रीत ब्रार टाकत होता. त्याने या षटकातील टाकलेल्या चौथ्या चेंडूवर पाटिदारने (Rajat Patidar) मोठा फटका खेळत तब्बल १०२ मीटरचा षटकार (102 meter Six) मारला.

पण, या षटकाराचा चेंडू स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या एका प्रेक्षकाला लागला. हा प्रेक्षक दिसताना वयस्कर दिसत होता. त्यांच्या डोक्याला पाटिदारने मारलेल्या षटकाराचा चेंडू लागला (ball hit a fan). त्यामुळे त्यांना वेदना झाल्याचे दिसले, तसेच त्यांच्या जवळची एक महिला त्यांचे डोके चोळतानाही दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

pic.twitter.com/qeHViGpOka

— Addicric (@addicric) May 13, 2022

pic.twitter.com/MS8jUwdL3s

— Varma Fan (@VarmaFan1) May 13, 2022

यापूर्वी याच आयपीएल हंगामात (IPL 2022) लखनऊ सुपर जायंट्स संघाचा युवा खेळाडू आयुष बदोनी यानेही चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मारलेल्या एका षटकाराचा चेंडू सामना पाहायला आलेल्या एका महिला चाहतीला लागला होता. ही घटना ७ व्या सामन्यात घडली होती.

पंजाबचा विजय
या सामन्यात (Royal Challengers Bangalore vs Punjab Kings) पंजाबने दिलेल्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. पंजाबकडून रबाडाव्यतिरिक्त रिषी धवन आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हरप्रीत ब्रार आणि आर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतके झळकावली. बेअरस्टोने २९ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. तसेत लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत ७० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. त्यामुळे पंजाबला २० षटकात ९ बाद २०९ धावा करता आल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने ४ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितसेनेविरुद्धच्या पराभवानंतरही एमएस धोनीचे मन जिंकणारे कृत्य, मुंबईच्या सदस्यांना दिले खास गिफ्ट

रबाडा @200! बेंगलोरविरुद्धच्या ३ विकेट्ससह मलिंगा, गुलला पछाडत ‘या’ विक्रमात गाठले तिसरे स्थान

अरेरे! पंजाबविरुद्ध पराभव तर झालाच, पण आरसीबीने ‘या’ नकोशा यादीतही पटकावला अव्वल क्रमांक


ADVERTISEMENT
Next Post
Ambati-Rayudu

अजब! अंबाती रायुडूची रिटायरमेंटची घोषणा, अर्ध्या तासात केले ट्वीट डिलीट

Dinesh-Karthik

"मी निवडकर्ता असतो, तर दिनेश कार्तिकला टी२० विश्वचषकासाठी नक्कीच संधी देईल"

Jonny-Bairstow

जॉनी बेअरस्टोने डावाच्या दुसऱ्याच षटकात हेजलवूडला चोपले २ गगनचुंबी षटकार, पाहून विराटही झाला हँग

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.