टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा सामना करावा. यानंतर संघ निवडी बाबत बऱ्याच चर्चा झाल्या. भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगला वाटतं की, टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धे मधील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाला त्यांच्या त्यांच्या योजनेत बदल करण्याची गरज आहे. रविवारी (३१ ऑक्टोबर) भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे.
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांनी आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध हरला आहे. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील दुसरा सामना असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोघेही हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत हरभजन सिंगने भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. त्याला विश्वास आहे की त्याने केएल राहुलच्या जागी क्रमवारीत शीर्षस्थानी आले पाहिजे.
हरभजन सिंगला विश्वास आहे की यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन संघाला स्फोटक सुरुवात देऊ शकतो आणि अलीकडे तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला, ‘माझ्या मते, इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये असणे आवश्यक आहे. जर त्याने रोहित शर्मासोबत सलामी दिली तर भारताला ती सुरुवात मिळू शकेल जी, संघ सध्या शोधत आहे. ईशान किशन हा स्फोटक फलंदाज आहे, तो कोणत्याही गोलंदाजावर दबाव आणू शकतो. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्याने मुंबईकडून आयपीएलच्या आपल्या शेवटच्या सामन्यात दमदार खेळी केली होती आणि सराव सामन्यातही त्याने उत्कृष्ट खेळी केली होती.’
नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीझन २०२१ मध्ये, इशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी मधल्या फळीत खेळताना काही काळ संघर्ष केला होता. मात्र, तो आपल्या फॉर्ममध्ये परतला आणि त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात केएल राहुलसोबत सलामी करताना त्याने नाबाद ७० धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहलीने केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जडेजा झाला निराश
हॅरिस रौफमुळे का चर्चेत आला टेप बॉल? काय असतो ‘हा’ प्रकार? जाणून घ्या सविस्तर