सध्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक टाकण्याचा लाजिरवाणा रेकाॅर्ड इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) नावावर आहे. पण भारतीय क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे. ज्याने भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा खराब रेकार्ड त्याच्या नावावर केला. त्या खेळाडूचे नाव आहे, हरभजन सिंग (Harbhajan Singh).
2022 मध्ये बर्मिंग्घम येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा केल्या होत्या. त्यामुळे ते कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले. बुमराहने या षटकाची सुरुवात चौकाराने केली. दुसरा चेंडू वाईड होता, त्याला चार बाय मिळाले. पुढचा चेंडू नो बॉल होता, ज्यावर बुमराहने षटकार ठोकला. पुढील पाच चेंडूंवर त्याने तीन चौकार, 1 षटकार आणि 1 धाव काढली होती.
वास्तविक, 2006 मध्ये लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तानचा कसोटी सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) एका षटकात 27 धावा दिल्या होत्या. त्यामुळे हरभजनचे हे षटक भारतीय कसोटी क्रिकेटचे आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक ठरले आहे.
पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) हरभजनच्या षटकात लागोपाठ षटकार ठोकले होते. त्याने षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर षटकार मारले, तर पुढच्या दोन चेंडूंवर 2 आणि 1 धावा काढल्या. हरभजन सिंग (Harbhajan Singh) भारतीय गोलंदाजाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणारा खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं…!!! ‘या’ दिवशी होणार WTCचा फायनल सामना, आयसीसीने केली घोषणा
घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज (टी20+वनडे+कसोटी)