माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने मुंबईतील अंधेरी भागातील आपले आलिशान अपार्टमेंट विकले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये त्याने हा पॅलेससारखा अपार्टमेंट विकत घेतला होता. तेव्हा त्याची किंमत सुमारे १४.५ कोटी रुपये होती. हरभजनने विकलेल्या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ सुमारे २९०० चौरस फूट आहे. या अपार्टमेंटमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने मुंबईतील त्याचे आलिशान अपार्टमेंट १७.५८ कोटी रुपयांना विकले आहे. ही माहिती ‘ज्यॅप की डॉट कॉम’वर (Zapkey.com) उपलब्ध दस्तऐवजातून आली आहे, हे संकेतस्थळ बांधकाम सौद्यांवर लक्ष ठेवते. हे अपार्टमेंट जेबीसी इंटरनॅशनल या कंपनीने विकत घेतले आहे आणि हा करार १८ नोव्हेंबर रोजीच झाला होता. या अपार्टमेंटसाठी खरेदीदाराने सुमारे ८८ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.
मनी कंट्रोल साइटच्या रिपोर्टनुसार, हरभजन सिंगचा हा अपार्टमेंट अंधेरी पश्चिम येथील रुस्तमजी एलिमेंट्सच्या ९ व्या मजल्यावर आहे आणि अपार्टमेंटचे क्षेत्रफळ सुमारे २९०० चौरस फूट आहे. हरभजनने डिसेंबर २०१७ मध्ये हे अपार्टमेंट विकत घेतले होते आणि मार्च २०१८ मध्ये नोंदणी केली होती. तेव्हा त्याची किंमत १४.५ कोटी रुपये होती. ज्या इमारतीत हरभजनचा अपार्टमेंट होता. त्यात सर्व आधुनिक सुविधांसह ५ बीएचके अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट आहेत.
श्रेयस अय्यरनेही कोटयवधींचा अपार्टमेंट घेतला आहे
ज्यॅपकी डॉट कॉमचे सह-संस्थापक संदीप रेड्डी म्हणाले की, “रियॅलिटी मार्केटमध्ये कोरोनापासून मोठ्या प्रणामात वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि लक्झरी सेगमेंटमध्ये अल्ट्रा लक्झरी मालमत्तांची वेगाने विक्री होत आहे. यापूर्वी, श्रेयस अय्यरने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लोअर परळमधील वर्ल्ड टॉवर्समध्ये २६१८ चौरस फूटावर पसरलेले एक अपार्टमेंट देखील खरेदी केले होते. त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये होती. त्यासाठी त्यांनी २४ लाखांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क भरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज
‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का