भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर मोठी टीका झाली होती. टी20 विश्वचषक व त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे अनेकजण रोहितकडून भारतीय संघाचे नेतृत्व काढून घेण्याचे म्हणत होते. आता याच प्रकरणावर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघ मागील दहा वर्षांपासून एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेला नाही. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ दोन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला. त्यामुळे अनेक जण त्याच्यावर निशाणा साधत भारतीय संघाचे नेतृत्व इतर खेळाडूंच्या हाती देण्याची मागणी समोर येत होती. त्याच मागणीबद्दल बोलताना हरभजन म्हणाला,
“प्रत्येक वेळी निकाल तुमच्या बाजूने लागेल असे नसते. यश मिळत नाही ही चिंतेचीच बाब आहे. मात्र, त्यावर कर्णधार बदलणे हा पर्याय होऊ शकत नाही. यापूर्वी विराटला बदलण्याची मागणी व्हायची. आता रोहितबाबतही तसेच केले जाते. भविष्यात ज्या खेळाडूंना कर्णधार म्हणून पाहिले जातेय, त्यांना अजून थोडे स्थिरस्थावर होऊ द्यायला हवे. हे भारतीय क्रिकेटच्या फायद्याचे ठरेल.”
रोहितचे कौतुक करताना तो म्हणाला,
“मी अनेक वर्ष रोहितसोबत अनेक वर्ष खेळलो आहे. तो एक मोठा नेता असून, ड्रेसिंग रूममध्ये त्याला भरपूर सन्मान मिळतो.”
हरभजन हा 2013 ते 2017 या कालावधीत मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला होता. नेतृत्वात मुंबई इंडियन्स सर्वाधिक पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पुढील काळात भारतीय नेतृत्वात वनडे विश्वचषक खेळेल.
(Harbhajan Singh Speaks On Rohit Sharma Leadership And Performance)
महत्वाच्या बातम्या –
“त्याने पाणीपुरी विकलीच नाही”, यशस्वीच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, “तो माझ्यामूळे…”
देशासाठी तीन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीवर माजी कर्णधाराचा निशाणा; म्हणाले, ‘कर्णधार तोच राहणार…’