जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 19 जुलैपासून सुरू होईल. मँचेस्टर येथे होणाऱ्या या सामन्यासाठी एक दिवस आधीच ऑस्ट्रेलियाने आपला अंतिम 11 चा संघ घोषित केला असून, या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड व कॅमेरून ग्रीन यांचे पुनरागमन झाले. त्यांनी स्कॉट बोलॅंड व टॉड मर्फी यांची जागा घेतली.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेत सहभागी झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवत पहिल्या दोन सामन्यात यजमान संघाला पराभूत केले. हेडिंगला येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडसाठी करा अथवा मरा अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संघात पुनरागमन करत असलेल्या वेगवान गोलंदाज मार्क वूड व अष्टपैलू ख्रिस वोक्स यांनी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत निर्णायक कामगिरी करताना इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्यामुळे इंग्लंडचे मालिकेतील आव्हान कायम राहिले.
उभय संघातील चौथा सामना 19 जुलैपासून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन आपल्या संघात दोन बदल केले. अनुभवी वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांना संधी दिली. हेजलवूड व ग्रीन मालिकेतील पहिले दोन सामने खेळला होता. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलेले. मात्र, असे असले तरी, आता ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने त्यांना पुन्हा एकदा खेळवण्याचा निर्णय घेतला. सलग दोन सामन्यात बळी मिळवण्यासाठी झगडलेला बोलॅंड व नॅथन लायनच्या जागी खेळलेला टॉड मर्फी हे संघातून बाहेर जातील.
चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ:
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स केरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड.
(Australia Announced XI For Manchester Test In Ashes Hazlewood And Green Comeback)
महत्वाच्या बातम्या –
“त्याने पाणीपुरी विकलीच नाही”, यशस्वीच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, “तो माझ्यामूळे…”
देशासाठी तीन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीवर माजी कर्णधाराचा निशाणा; म्हणाले, ‘कर्णधार तोच राहणार…’