दुबई। रविवारी(23 सप्टेंबर) 14 व्या एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर फोरचा दुसरा सामना पार पडला. हा सामना भारताने 9 विकेट्सने जिंकत अंतिम सामन्यातील स्थानही पक्के केले आहे.
मात्र या सामन्यात पहिल्याच चेंडूवर थर्ड अंपायर ग्रेगरी ब्रेथवेटकडून एक मोठी चूक झाली होती. त्यांनी पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फकार जामनला चूकून धावबाद दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय सुधारत नाबाद दिले.
हे पहिले षटक भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्नेवर कुमारने टाकले होते. या षटकातील पहिला चेंडू पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकने खेळला. यावेळी फकार आणि इमाम धाव घेण्यासाठी धावले. पण चेंडू स्टंपला लागण्याआधीच फकार क्रिजमध्ये परतला.
या चेंडूवर भारतीय संघाने धावबादसाठी अपील केले होते. पण फकार क्रिजमध्ये सुरक्षित पोहचला होता.
या घटनेनंतर भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने समालोचन करत असताना थर्ड अंपायर ब्रेथवेट यांना ट्रोल केले आहे. तो म्हणाला, “या तो प्रेशर है…या फिर… दुबई मे कल विकेंट था, तो लंबी रात हुई हैं… पार्टी दुबईमे बहुत बढ़ीयां होती हैं”
या सामन्यात पाकिस्तानकडून शोएब मलिक आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने 107 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला 237 धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
तर भारताकडून 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने 210 धावांची द्विशतकी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. तसेच या दोघांनी शतकेही केली.
महत्वाच्या बातम्या –
–शिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज
–‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा?
–तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट