---Advertisement---

हरभजन म्हणतोय,’ अनिल भाई तुम्ही खूप लालची आहात’; वाचा‌ संपूर्ण प्रकरण

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 6:27 PM
anil-k-harbhajan
---Advertisement---

भारतीय संघाचे (team india) माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे (anil kumble) यांनी ७ फेब्रुवारी १९९९ मध्ये एक असा कारनामा केला, जो कोणत्याच भारतीय गोलंदाजाला आजपर्यंत जमला नाही. अनिल कुंबळेंनी पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वच्या सर्व १० विकेट्स एकट्याने घेतल्या होत्या. आता या गोष्टीला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या हरभजन सिंगने (harbhajan singh) याविषयी एक मजेशीर ट्वीट केले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात जम्बो नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेंनी इतिहास रचला. कुंबळेंनी या सामन्यात २६.३ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये विरोधी संघातील सर्व १० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुंबळेंच्या या प्रदर्शनाची नोंद इतिहासात झाली. हरभजन सिंगही या सामन्यात भारतीय संघात सहभागी होता, परंतु त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. कुंबळेंच्या या प्रदर्शनामुळे पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली होती.

आता या ऐतिहासिक सामन्याची आठवण काढत हरभजनने एक गमतीशीर ट्वीट केले आहे. हरभजनने या ट्वीटमध्ये लिहिले की, “काय दिवस होता. परंतु अनिल कुंबळे तुम्ही खूप स्वार्थी आहात, १० च्या १० विकेट्स घेतल्या. मला एक तरी घेऊ द्यायची, अनिल भाई तुम्ही ग्रेट आहात.” हरभजनच्या या ट्वीटवर कुंबळेंनी प्रत्युत्तर देत धन्यवात म्हटले आहे.  दरम्यान, अनिल कुंबळे त्यांच्या काळाता भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचा महत्वाचा भाग होते. त्यांच्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या १३२ सामन्यांमध्ये त्यांनी ६१९ विकेट्स घेतल्या, जो आजही विक्रम आहे.

अनिल कुंबळेंनी पाकिस्ताविरुद्धच्या त्या सामन्यात जो विक्रम केला, तो आतापर्यंत भारताचा इतर कोणत्या गोलंदाजा जमला नाहीच. पण विदेशातील फक्त दोन गोलंदाज ही कामगिरी करू शकले आहेत. क्रिकेटच्या १४० वर्षांच्या इतिहातात इंग्लंडचे माजी दिग्गज जिम लेकर, अनिल कुंबळे आणि न्यूझीलंडचा एजाज पटेल यांनी एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

जिम लेकर यांनी हा पराक्रम १९५६ साली केला होता, तर अनिल कुंबळेंनी १९९९ मध्ये. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मागच्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात कसोटी मालिका खेळली गेली. या कसोटी मालिकेत एजाज पटेलले एका डावात भारातच्या सर्व विकेट्स एकट्याने घेतल्या आणि या दिग्गजांच्या यादीत सामील झाला.

महत्वाच्या बातम्या –

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी दिनेश कार्तिक करतोय जोरदार सराव,मुंबईचा हा क्रिकेटपटू करतोय मदत

युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण

एशियन गेम्समधील २ वेळचे सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार यांचे निधन; महाभारतात साकारलेला ‘भीम’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---