---Advertisement---

कुणीतरी येणार येणार गं..! ‘भज्जी’च्या घरी पुन्हा हालणार पाळणा, फोटो व्हायरल

On: रविवार, मार्च 14, 2021 8:56 PM
---Advertisement---

भारतीय संघात ‘भज्जी’ नावाने प्रसिद्ध असलेला माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी हरभजनच्या चित्रपटाचा टिजर चर्चेचा विषय बनून होता. तसेच आता गीताने इंस्टाग्रामवर शेअर केलेली एक गोड बातमी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

हरभजन आणि गीता हे दोघेही २०१५ साली विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली होती. तिचे नाव त्यांनी हिनाया असे ठेवले होते. नुकतेच गीताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने नवीन पाहुणा येणार असल्याचे संकेत दिले आहेत. तिने हरभजन सिंग आणि हिनाया सोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लिहले आहे की, ‘लवकरच येणार, जुलै २०२१.’ पुढे तिने हार्टचा ईमोजी देखील टाकला आहे.

यावरून स्पष्ट होत आहे की, येत्या जुलै महिन्यात हरभजनच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आमगन होणार आहे. या फोटोमध्ये हरभजनसह गीता आणि हिनाया तिघेही सारख्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. तसेच हिनायाच्या हातात एक टी-शर्ट आहे, ज्यावर लिहिले आहे की,’लवकरच मोठी बहीण होणार’.

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

https://www.instagram.com/p/CMZLFSwMXy7/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CG6mAnogI6_/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CFoyGOmAO_J/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CMPkU94M8bh/?utm_source=ig_web_button_share_sheet

गीता बसरा ही एक सीने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत काम केले आहे. तिने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात इमरान हाश्मी सोबत ‘दिल दे दिया हैं’ या चित्रपटातून केली होती. त्यांनतर ती पुन्हा ‘द ट्रेन’ या चित्रपटात झळकली होती. तिचे इमरान हाश्मीसोबत असलेले ‘ओ अजनबी’ हे गीत खूप प्रसिद्ध झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG 2nd T20 Live : पहिल्याच षटकात विकेट गमावल्यानंतर जेसन रॉयने इंग्लंडला सावरले, १० षटकात इंग्लंडच्या २ बाद ८३ धावा

‘भूवी’ के वार से बचना नामुमकीन! विकेट वाचवण्याचा बटलरचा प्रयत्न व्यर्थ, ‘असा’ झाला शून्यावर पायचित

युवराजने सलग पाचवा षटकार न मारण्यामागे होते ‘हे’ कारण; स्वत:च केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---