---Advertisement---

हार्दिक आणि कृणालने आज जगभरात ओळख मिळवली, पण त्यासाठी वडीलांनी घेतले होते अपार कष्ट

On: गुरूवार, मार्च 25, 2021 12:02 AM
---Advertisement---

इंग्लड आणि भारत यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय मध्ये शानदार पदार्पण करणार्‍या कृणाल पंड्याचा आज वाढदिवस आहे. 24 मार्च 1991 रोजी जन्मलेल्या कृणाल पंड्याचा आज 30 वा वाढदिवस आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा इतिहास घडवणारा कृणाल सामन्यापूर्वी आणि नंतर भावनिक दिसत होता. तो नुकताच आपल्या गमावलेल्या वडिलांना आठवत होता. विजयानंतर त्याने आपली खेळी वडिलांना समर्पित केली. तसेच त्याने ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, ‘सामन्यादरम्यान तुम्ही माझ्याबरोबर होता.”

विशेष म्हणजे या सामन्यात हार्दिक पंड्या हा कृणालचा धाकटा बंधू देखील या सामन्याचा भाग होता. त्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर दोन भाऊ भारताकडून वनडेत एकत्र खेळताना दिसले. हार्दिक आणि कृणाल या दोघांनी आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये मोठी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये त्यांच्या वडीलांची यात मोलाची भूमिका होती. हेच कारण आहे की दोघेही त्यांच्या यशाचे योगदान नेहमी वडिलांच्या संघर्षाला देतात आणि त्यांचे महत्त्व दाखवून देतात.

यावर्षी 16 जानेवारी रोजी, कृणाल आणि हार्दिक यांच्या वडीलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच दोन्ही क्रिकेटपटूंवर दु: खाचा डोंगर कोसळला होता.

जेव्हा हे दोन्ही भाऊ आयपीएलमध्ये निवडले गेले तेव्हा वडिलांच्या संघर्षाचे फळ दिसून आले. पंड्या आज आपल्या स्टाईल स्टेटमेंट, मस्त आणि विलासी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असला तरी या खेळाडूने आपल्या आयुष्यातील खूप कठीण प्रसंगही पाहिले आहेत.

गुजरातच्या अष्टपैलू खेळाडूंनी आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळताच संधीचे सोने केले. कृणालने यापूर्वी टी२० संघात पदार्पण केले आहे, पण आता त्याला वनडेमध्येही संधी मिळाली आहे. ज्याचा त्याने पुर्णपणे फायदा घेतला. त्याचा लहान भाऊ हार्दिकने यापूर्वीच संघात स्थान मिळवले असून जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेशही करण्यात आला आहे.

कृणाल-हार्दिकचे वडील हिमांशू पांड्या गुजरातमधील सूरत येथे फाईनान्स विभागात काम करीत होते. ते त्यांना 1998 मध्ये बंद करावे लागले आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब पुन्हा बडोद्याला गेले. हिमांशु पंड्या हा एक क्रिकेटची खूप आवड होती ते आपल्या दोन मुलांना क्रिकेटचे सामने बघण्यासाठी घेऊन जात असे. यातूनच हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू बनण्याची प्रेरणा मिळाली. घराची आर्थिक परिस्थितीला न जुमानता हिमांशू यांनी आपल्या मुलांना बडोद्यातील किरण मोरे अकादमीत पाठवले आणि इथूनच त्यांचा क्रिकेटपटू होण्याचा प्रवास सुरू झाला.

एका चॅनेलशी बोलताना खुद्द कृणालनी सांगितले की, दहावीत तो तीन वेळा नापास झाला होता. पण त्याने हार मानली नाही आणि नंतर कॉलेज पुर्ण केले. आर्थिक अडचणींमुळे कृणाललाही खूप संघर्ष करावा लागला. स्पीड पोस्टमध्ये सरकारी नोकरीच्या चाचणीसाठी त्याला पत्र आले होते. पण त्याच दिवशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी एक चाचणी सामनादेखील होता. मात्र कृणालने सरकारी नोकरीचे पत्र फाडले आणि चाचणीमध्ये जोरदार खेळ केला आणि बडोद्याच्या टीममध्ये सामील झाला, ज्यात हार्दिक अगोदरच तिथे होता.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे क्रमवारी: विराट कोहली अव्वल क्रमांकावर कायम, मात्र रोहित शर्मा…

आठवणीतील सामना: भारताने जेव्हा सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर फेरले होते पाणी

INDvENG: श्रेयश अय्यर वनडे मालिकेतून बाहेर; दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---