भारत-इंग्लंड यांच्यात मंगळवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर जखमी झाला. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर लगेच त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. त्यामुळे, दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघामध्ये बदल होणे नक्की आहे. आज आपण या लेखात हे जाणून घेऊया की, श्रेयस अय्यरच्या जागी दुसर्या वनडे सामन्यात त्याची जागा कोण घेईल.
मुंबईकराला मिळू शकते संधी
भारत-इंग्लंड यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात केली. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. परंतु, दुसर्या आंतरराष्ट्रीय सामन्यात स्फोटक शैलीत फलंदाजी करत सूर्याने ५७ धावा ठोकल्या.
त्याचबरोबर अंतिम सामन्यात १८८.२४ च्या स्ट्राईक रेटसह फलंदाजी करत ३२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. श्रेयस अय्यरच्या जागी कर्णधार कोहली आणि संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती सूर्यकुमार यादव असेल.
सूर मारल्याने निखाळला खांदा
इंग्लंडच्या डावातील दुसऱ्या षटकात अय्यरने चेंडू अडविण्यासाठी सूर मारला. या दरम्यान त्याचा खांदा जमिनीवर आदळल्याने त्याला दुखापत झाली. उपचाराअंती स्पष्ट झाले की त्याचा खांदा निखळला आहे. या कारणाने तो मालिकेतून बाहेर पडला. तसेच, आठ आठवडे तो क्रिकेट खेळू शकणार नाही.
रोहितही आहे दुखापतग्रस्त
या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माही पहिल्या डावात कोपरवर चेंडू लागल्यामुळे जखमी झाला होता. परंतु, त्यानंतर पंचांनी वेदनाशामक दिले. त्याशिवाय पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्ज देखील दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या खांद्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याने चालू सामन्यात मैदान सोडले.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारत पाठविणार मोठे पथक? कोरोना नाही तर ‘हे’ आहे कारण
आयपीएल २०२१: चेन्नईचा संघ दिसणार नव्या अंदाजात! धोनीने केले नव्या जर्सीचे अनावरण