भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik Pandya) याच्या कारकिर्दीतील सध्या वाईट काळ सुरू आहे. दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता येत नाहीये. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतोय. सध्या तो भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे मिळालेल्या रिकामा वेळ तो आपल्या कुटुंबासोबत घालवताना दिसून येत आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.(Hardik Pandya and agastya cute video went viral on social media)
हार्दिक पंड्या हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. त्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. ज्याचे मनोरंजन करण्यासाठी तो मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने आपल्या मुलासोबतचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. (Agastya)
त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो आपला मुलगा अगस्त्य सोबत मस्ती करताना दिसून येत आहे. क्यूट अगस्त्य देखील हार्दिकची कंपनी एन्जॉय करताना दिसून येत आहे. हा क्यूट व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचा दिवस बनेल यात काही शंका नाही. या व्हिडिओमध्ये दोघेही प्लेइंग रूममध्ये आहेत. या दोघांची बाँडींग पाहून चाहते ही भलतेच खुश झाले आहेत. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. तसेच या व्हिडिओवर कॅप्शन म्हणून त्याने, “त्याच्यासोबत खेळणे एक आशीर्वाद आहे..” असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/reel/CXn9Ye5lQU3/?utm_medium=copy_link
हा व्हिडिओ काही तासातच प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला ७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर नताशा स्टानकोविकने देखील प्रतिक्रीया दिली आहे. तिने ३ हार्टचे ईमोजी शेअर केले आहेत. तर एका युजरने लिहिले की, “बेस्ट फादर सन ड्युओ” तर आणखी एका युजरने लिहिले की, “अगस्त्य सुपर क्यूट आहे.” तसेच या व्हिडिओवर आणखी युजर्स आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस
बीसीसीआय-विराट वाद रंगला असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; दिले ‘हे’ कारण






