---Advertisement---

धोनी आणि पंड्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल, काला चष्मा गाण्यावर थिरकले पाय

Hardik pandya and MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्यामध्ये चांगली बॉंडिग आहे. हार्दिक नेेहमी म्हणतो की धोनी त्याच्यासाठी मित्र आणि मोठ्या भावासारखा आहे. नुकताच हार्दिकने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला टी20 मालिकेत 1-0ने विजय मिळवून दिला. यामुळे आगामी काळात पंड्याला भारतीय टी20 संघाचा स्थायी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली. मायदेशी परतल्यावर पंड्याने धोनीची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहेे.

मायदेशी परतल्यावर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग (Mahendra Singh Dhoni) धोनी याची भेट घेतली. त्याचबरोबर प्रसिद्ध गायक बादशाह हा देखील त्याठिकाणी उपस्थित होता. यावेळी धोनी आणि पंड्याने बादशाहच्या काला चष्मा या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्यांच्या याच डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल झाला.

बऱ्याच क्रिकेट जाणकारांना हार्दिकच्या नेतृत्वात धोनीची झलक दिसते. हार्दिकने फक्त नेतृत्वच नाही तर फिनिशरचे धडे देखील धोनीकडून घेतले. धोनीने 15 ऑगस्ट 2020 या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. हार्दिक पंड्याने 2021च्या विश्वचषकानंतर धमाकेदार पुनरागमन केले. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2022चे जेतेपद मिळवून दिले. त्याच्या याच नेतृत्वाच्या गुणांमुळे त्याला भारतीय टी20 संघाचा स्थायी कर्णधार बनवावे अशी ईच्छा भारताच्या अनेक क्रिकेट दिग्गजांनी बोलून दाखवली.

ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. त्यानंतर भारतीय न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यावर खेळलेल्या टी 20 मालिकेतील भारतीय संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली 1-0ने ही मालिका आपल्या खिशात घातली.(Hardik Pandya and Mahendra Singh Dhoni’s video gone viral while Dancing)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा! वनडे ओपनर म्हणून ‘मोठ्या’ विक्रमात सचिन-रोहित अन् धवनलाही पछाडलं
भले-भले आले, पण आयपीएलचा ‘हा’ जबरा रेकॉर्ड धोनीच्या ‘चिन्ना थाला’च्याच नावावर कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---