ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे खेळाडू एकामागून एक मोहालीत पोहोचले आहेत. मंगळवारपासून (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही तीन टी20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आणि विराट कोहली एकत्र नृत्य करताना दिसत आहेत. चाहत्यांची या व्हिडिओला चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसतेय.
हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून विराट कोहलीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते दोघे शाकाबूम गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे गाणे सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंड करतेय. या गाण्यासाठी वापरण्यात येणारी तीच हुक स्टेप हे दोन्ही स्टार खेळाडू करताना दिसतायेत. डोळ्यावर गॉगल आणि चप्पल घालून दोन्ही खेळाडू चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव घेऊन नृत्य करताना दिसले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले की,
‘तुम्हाला माहित आहे का आम्ही हे कसे केले? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडू स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी अशा कृती करताना दिसतात.
You know how we do ???? @imVkohli pic.twitter.com/YAJVUB5bYP
— hardik pandya (@hardikpandya7) September 18, 2022
आशिया चषकातून फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहली याच्यासाठी ही मालिका आणखी महत्त्वाची ठरेल. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करतो. 2016 टी20 विश्वचषकात मोहलीमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी करत भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ क्रिकेट-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेंगळुरू एफसी बनले ड्यूरंड कपचे चॅम्पियन! कोस्टाचा विनर मुंबईवर भारी
अखेर टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण! पाहा लूक आणि इतर खासियत
जेव्हा झुलन गोस्वामीच्या इनस्विंगने रोहित शर्माचाही केला होता बट्ट्याबोळ






