---Advertisement---

अरर थोडक्यात वाचला! पहिल्याच षटकात हार्दिकने टिपला धवनचा अप्रतिम झेल, पण… पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 10:54 PM
---Advertisement---

मंगळवार रोजी (२० एप्रिल) एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमने सामने होते. एकाहून एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेल्या या उभय संघात चुरसीची लढत पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात कशाबशा १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पहिल्याच षटकात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात दिल्ली संघाला मोठा झटका बसता बसता वाचला.

त्याचे झाले असे की, मुंबईच्या १३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची ठरलेली सलामी जोडी धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात उतरले होते. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे हत्यार वापरण्याचे ठरवले. परंतु धवनने खणखणीत चौकारांसह आपले खाते उघडले.

अशात बोल्टने षटकातील शेवटचा चेंडू अतिशय चपळाईने टाकला. यावर धवनने ऑन साइडला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु अष्टपैलू हार्दिक पंड्याप्रमाणे आधीपासून ऑन साइडला सावध उभा असल्याने त्याने झेल पकडण्याची संधी सोडली नाही. एकअंगी डाइव्ह मारत त्याने मैदानाला चेंडू स्पर्श करत झेल पकडला.

सामना पंचांना झेल पकडताना चेंडू मैदानाला स्पर्श झाला आहे का नाही? हे न कळाल्याने त्यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. अखेर पडताळणीनंतर हार्दिकचे बोट चेंडू पकडण्यापुर्वी मैदानाला लागल्याचे दिसल्याने धवनला नाबाद करार करण्यात आले.

भलेही धवनला पहिल्याच षटकात जिवनदान मिळाले, परंतु हार्दिकने झेल पकडण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून चाहते भलतेच प्रभावित झाल्याचे दिसून आले. अनेकांनी त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

https://youtu.be/PKzC1h9bWlg

परंतु क्षेत्रऱक्षणात अप्रतिम कामगिरी करणारा हार्दिक फलंदाजीत मात्र साजेशी खेळी करु शकला नाही. मधल्या षटकात संघाला त्याच्याकडून मोठ्या आकडी धावसंख्येची अपेक्षा असताना तो भोपळाही न फोडता पव्हेलियनला परतला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिकला अमित मिश्राने स्टिव्ह स्मिथच्या हातून शून्यावर धावबाद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

हिट है बॉस! रोहितने लाँग ऑफला एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, पाहा झक्कास व्हिडिओ

वा मिश्राजी वा! केली मुंबईविरूद्ध कोणालाही न जमलेली कामगिरी

DC vs MI Live : अमित मिश्राच्या फिरकीपुढे मुंबईच्या फलंदाजांचे लोटांगण, दिल्लीला विजयासाठी १३८ धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---