---Advertisement---

वा मिश्राजी वा! केली मुंबईविरूद्ध कोणालाही न जमलेली कामगिरी

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 10:12 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. चेन्नईच्या एम ए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. विशेषतः अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचायला भाग पाडले. मिश्राने या सामन्यात ४ बळी मिळवून एक खास विक्रम आपल्या नावे केला.

अमित मिश्राची अप्रतिम गोलंदाजी
आजच्या या सामन्यासाठी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने संघात दोन बदल केले. ख्रिस वोक्स व लुकमन मेरिवाला यांच्या जागेवर शिमरन हेटमायर यांना संधी दिली. अमित मिश्राने कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला‌. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत त्याने मुंबईच्या तडाखेबंद फलंदाजांना नाकीनऊ आणले.
मिश्राने संघासाठी फिरकी गोलंदाजीचा प्रमुख बनत चार षटकात २४ धावा देऊन ४ फलंदाजांना बाद केले. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड व ईशान किशन त्याचे बळी ठरले.

मिश्राची विक्रमी कामगिरी
या सामन्यात अमित मिश्राने एक खास कामगिरी केली. मिश्राचा आजचा स्पेल हा दिल्ली कॅपिटल्सच्या कोणत्याही गोलंदाजांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध टाकलेला आत्तापर्यंतचा सर्वोत्तम स्पेल आहे. यापूर्वी दिल्लीच्या कोणत्याही गोलंदाजाने मुंबई विरूद्ध टाकलेला सर्वात्तम स्पेल यो महेशने टाकला होता. त्याने ३६ धावा देऊन मुंबईचा चार फलंदाजांना तंबूत पाठवलेले.

दिल्लीच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी
नाणेफेक गमावल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी मिळालेली गोलंदाजीची संधी साधली. मुंबईच्या सर्व आक्रमक फलंदाजांना वेसण घालताना निर्धारित २० षटकात ९ बाद १३७ धावा करू दिल्या. अमित मिश्राने सर्वाधिक ४ बळी आपल्या नावे केले. आवेश खानने दोन तर मार्कस स्टॉयनिस, कगिसो रबाडा व ललित यादवने प्रत्येकी एक बळी मिळविला.

महत्वाच्या बातम्या:

व्हिडिओ : जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची धोनीलाही पडली भुरळ

DC vs MI Live : अमित मिश्राच्या फिरकीपुढे मुंबईच्या फलंदाजांचे लोटांगण, दिल्लीला विजयासाठी १३८ धावांचे आव्हान

रियान पराग होतोय जोरदार ट्रोल, चाहत्यांनी बोलल्या या गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---