---Advertisement---

रियान पराग होतोय जोरदार ट्रोल, चाहत्यांनी बोलल्या ‘या’ गोष्टी

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 9:30 PM
---Advertisement---

राजस्थान सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू रियान पराग पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. परागने आयपीएलच्या १२ व्या सामन्यात गोलंदाजी करताना एका विचित्र पद्धतीने चेंडू टाकला. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या गोलंदाजी शैलीवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पंजाबविरुद्ध ही केली होती अशी गोलंदाजी 
यापूर्वी, पंजाब किंग्सविरुद्धही रियान परागने अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. लसिथ मलिंगा प्रथमता अशा तऱ्हेने गोलंदाजी करून चर्चेत आलेला. याआधी, भारतीय संघासाठी केदार जाधव या पद्धतीने गोलंदाजी करत असत. आता या श्रेणीत रियान परागचे नाव जोडले गेले आहे. रियान परागने एक षटक गोलंदाजी केली आणि त्यात १६ धावा लुटविल्या.

चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
रियान परागने अशा पद्धतीने गोलंदाजी केल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. एका चाहत्याने त्याच्या गोलंदाजीला अवैध ठरविण्याची मागणी केली. एका चाहत्याने त्याची तुलना केदार जाधवशी केली.

चेन्नईचा धमाकेदार विजय
सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईने हंगामातील आपला दुसरा विजय साजरा करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सर्व प्रमुख फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकात १८८ धावा फलकावर लावल्या होत्या.
प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर जोस बटलर वगळता कोणीही चेन्नईच्या गोलंदाजांचा फारसा प्रतिकार केला नाही. बटलरने ४९ धावांचे योगदान दिले. चेन्नईसाठी मोईन अलीने ३ तर, सॅम करन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बडी आपल्या नावे करत राजस्थानचा डाव १४३ पर्यंत रोखला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मोईन अलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

DC vs MI Live : अमित मिश्राच्या फिरकीपुढे मुंबईच्या फलंदाजांचे लोटांगण, दिल्लीला विजयासाठी १३८ धावांचे आव्हान

या कारणाने हार्दिक पंड्या करत नाहिये गोलंदाजी, मुंबईच्या प्रशिक्षकांचा खुलासा

भेटा माझ्या हेअरस्टाईलिस्टला! पाहा का म्हणतोय असं राहुल चाहर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---