---Advertisement---

“भेटा माझ्या हेअरस्टाईलिस्टला!” पाहा का म्हणतोय असं राहुल चाहर

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 7:52 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज राहुल चहरने यंदाच्या आयपीएल मोसमात शानदार गोलंदाजी केली आहे. मुंबई इंडियन्स कडून त्याने यंदाच्या हंगामात शानदार प्रदर्शन केले आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील तो पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये आहे.

एकीकडे तो आपल्या फिरकी गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना सळो की पळो करून सोडण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसरीकडे त्याने आपल्या हेअरस्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर त्याच्या होणारी पत्नी ईशानीसोबत एक फोटो शेयर केला असून त्याखाली ‘हेअर स्टायलिस्टला भेटा’ असे लिहले आहे. त्याची होणारी पत्नी एक हेअरस्टाईलिस्ट आहे.

राहुलने पोस्ट केलेला त्यांचा हा सध्या फोटो सोशल मीडियावर खूप जोरदार व्हायरल होत आहे. 2019 मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली होती.

https://www.instagram.com/p/CN2WUhSho4f/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएलमध्ये राहुल पाच वेळच्या आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात राहुलने केकेआरविरूद्ध अप्रतिम गोलंदाजी करून 4 बळी मिळवले होते. याशिवाय सनरायजर्स हैदराबाद विरूद्धही शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत त्याने तीन बळी मिळवले होते.

त्याने आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत 3 सामन्यात 8 बळी घेतले आहेत. पर्पल कॅप शर्यतीत तो सध्या दुसर्‍या क्रमांकावर असून सध्या पहिल्या क्रमांकावर आरसीबीचा हर्षल पटेल आहे. त्याने आतापर्यंत एकूण 9 बळी घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

फुटबॉल जगतात आले वादळ, या बड्या युरोपियन संघानी उभारली बंडखोर लीग

विराटचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पडणार लांबणीवर? वाचा काय आहे प्रकरण

DC vs MI Live : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये केले हे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---