---Advertisement---

विराटचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पडणार लांबणीवर? वाचा काय आहे प्रकरण

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 5:32 PM
---Advertisement---

भारतातील कोरोना रुग्णांच्या सततच्या वाढत्या संख्येमुळे देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यामुळेच जगभरातील देशांना यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलावी लागत आहेत. वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये स्थान दिले आहे. या यादीमध्ये सामील झाल्यानंतर ब्रिटनने भारतातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासावर बंदी घातली. त्याचबरोबर, भारतातून परत यूकेला येणार्या ब्रिटिश नागरिकांसाठी १० दिवसांचे विलगीकरण अनिवार्य केले.

भारतीय संघासाठी झाली अडचण
त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघासाठी अडचण निर्माण झाली आहे. भारतीय संघाला जूनमध्ये साऊथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळायचा असून, अशा परिस्थितीत या सामन्यावरही धोका निर्माण झाला आहे. भारताची परिस्थिती याक्षणी भयावह असून, दररोज कोरोना प्रकरणांची नोंद रोज लाखांनी वाढतेय. भारतातील कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक सिद्ध होत आहे.

ठरलेल्या वेळेत होणार अंतिम सामना
भारत रेड लिस्टमध्ये असूनही आयसीसीचा असा विश्वास आहे की, डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचे आयोजन बायो बबलमध्ये होईल. अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ईसीबी आणि इतर सदस्यांनी सांगितले की या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा अंतिम सामना संपूर्ण सुरक्षेसह आयोजित करू. हा सामना त्याच ठरलेल्या वेळी होईल. आम्ही सध्या रेड लिस्ट देशांविषयी ठरलेल्या नियमांविषयी यूके सरकारशी बोलत आहोत. भारतीय महिला संघालाही जून महिन्यात यूके दौरा करावा लागणार आहे. दुसरीकडे, पुरुष संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत.’

आयसीसीने बनवलाय नवा नियम
याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोरोनामधील कठीण काळात वेगळ्या आवश्यकता लक्षात घेऊन सात अतिरिक्त खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचार्‍यांना वरिष्ठ स्पर्धांमध्ये संघाबरोबर जाण्याची परवानगी दिली होती. यामुळे भारतीय संघ जूनमध्ये होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ३० सदस्यांसह जाऊ शकेल. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसीने मोठ्या स्पर्धांमध्ये जेथे विलगीकरण आवश्यक आहे तेथे, सात अतिरिक्त खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचारी समाविष्ट करण्यास सदस्यांना परवानगी दिली आहे. हे सर्वजण बायो बबलमध्ये राहतील.”
कोरोनाच्या पहिला लाटेनंतर क्रिकेट जेव्हा सुरू झाले तेव्हापासून सर्व खेळाडू कोणत्याही मालिकेपूर्वी बायोबबलमध्येच राहतात. यामध्ये खेळाडूंना ठरवून दिलेल्या जागां व्यतिरिक्त इतरत्र फिरता येत नाही.

महत्वाच्या बातम्या:

DC vs MI : नवख्या पंतसमोर अनुभवी रोहितचे आव्हान, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी हा घातक गोलंदाज झाला फिट

याला विमानातून खाली फेका रे! मिस्टर नॅग्सची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---