---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 4:17 PM
---Advertisement---

आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी मागील सामना जिंकल्याने आजच्याही सामन्यात तीच विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याच दरम्यान दिल्लीच्या संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. दिल्लीचा महत्वाचा खेळाडू दुखापतीतून सावरल्याने या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

गोलंदाजी आक्रमण होणार मजबूत 
दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीतून सावरला आहे. तो पूर्णपणे फिट असून मुंबई विरुद्धच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली संघासाठी ही आनंदाची बातमी असून त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाला इशांतच्या आगमनाने अजूनच बळकटी मिळणार आहे.

इशांतच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो पहिल्या तीन सामन्यात संघाचा भाग नव्हता. त्याच्या जागी दिल्लीच्या संघाने आवेश खान या युवा वेगवान गोलंदाजाला संधी दिली होती. त्याने तीनही सामन्यात समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे आता दिल्लीचे संघ व्यवस्थापन इशांतचा लगेच संघात समावेश करणार का, की आवेश खानलाच अजून काही सामन्यात संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

मागील आयपीएलमध्ये देखील झाली होती दुखापत 
संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई येथे खेळवल्या गेलेल्या आयपीएलच्या मागील हंगामात देखील इशांतला दुखापत झाली होती. पहिल्याच सामन्यानंतर दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले होते. आणि त्यानंतर संपूर्ण हंगामाला तो मुकला होता. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला देखील मुकावे लागले होते. नंतर त्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते.

आज मुंबई इंडियन्सविरुद्ध लढत 
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दोन हात करायला मैदानात उतरेल. यंदाच्या हंगामात तीन पैकी दोन सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या:

याला विमानातून खाली फेका रे! मिस्टर नॅग्सची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा 

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---