---Advertisement---

DC vs MI : नवख्या पंतसमोर अनुभवी रोहितचे आव्हान, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 5:09 PM
rohit sharma rishabh pant
---Advertisement---

आयपीएल २०२१चा १३वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघांमध्ये आज खेळवला जाईल. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यात विजय आणि एक पराभव अशी कामगिरी केली आहे. मात्र दोन्ही संघांनी आपापले मागील सामने जिंकले आहेत. त्यामुळे हीच विजयी लय आजच्या सामन्यात कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय असेल, याचा आपण आढावा घेऊया.

दिल्ली कॅपिटल्स – 
दिल्लीने मागच्या सामन्यात पंजाब किंग्जचा सहज पराभव केला होता. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने शिखर धवनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हा सामना सहज खिशात घातला होता. धवनसह मार्कस स्टॉयनिस आणि पृथ्वी शॉ देखील चांगली कामगिरी करत आहेत. मात्र अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या स्टीव स्मिथला मागच्या सामन्यात अपयश आले होते. मात्र एकाच सामन्यातील कामगिरीवरून त्याला संघाबाहेर केले जाणार नाही, अशी शक्यता आहे.
गोलंदाजी विभागात दिल्लीने समाधानकारक प्रगती केली आहे. मात्र एनरिच नॉर्त्जेला संघात सामील करायचे असल्यास ख्रिस वोक्सला वगळावे लागेल. तसेच इशांत शर्मा फिट झाल्याने या सामन्यासाठी उपलब्ध आहे. मात्र त्याच्या जागी संधी मिळालेल्या आवेश खानने पहिल्या तीन सामन्यात चांगली कामगिरी केल्याने इशांतला संघात जागा मिळणे कठीण आहे.

दिल्लीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, लुकमान मेरीवाला, क्रिस वोक्स/एनरिच नॉर्त्जे, आर अश्विन, अवेश खान, कॅगिसो रबाडा

मुंबई इंडियन्स –
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ समतोल भासतो आहे. पहिल्या तीनही सामन्यात त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. मात्र संघातील सगळ्याच फलंदाजांनी यापूर्वी दमदार कामगिरीने संघाला सामने जिंकवून दिल्याने त्यांच्यावरच व्यवस्थापन विश्वास कायम ठेवेल.
गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. लेगस्पिनर राहुल चाहर देखील त्यांना सुयोग्य साथ देतो आहे. अष्टपैलू कृणाल पंड्या पाचव्या गोलंदाजाची भूमिका चोख पार पडतो आहे. मात्र चेन्नईच्या मैदानावर फिरकीपटूंना मदत मिळत असल्याने वेगवान गोलंदाज एडम मिल्नेच्या जागी या सामन्यात ऑफस्पिनर जयंत यादवला संधी मिळू शकते.

मुंबईची संभाव्य प्लेईंग इलेव्हन –
क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रोहित शर्मा(कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, एडम मिल्ने/जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

महत्वाच्या बातम्या:

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी हा घातक गोलंदाज झाला फिट

याला विमानातून खाली फेका रे! मिस्टर नॅग्सची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा 

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---