---Advertisement---

व्हिडिओ : जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची धोनीलाही पडली भुरळ

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 9:52 PM
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (१८ एप्रिल) पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात धोनीच्या बलाढ्य संघाने युवा संजू सॅमसनच्या संघाला ४५ धावांनी धूळ चारली. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरा विजय विजय मिळवला. या विजयानंतर जड्डूने आगळवेगळ सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला १४३ धावा करण्यात यश आले होते. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने या सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवला.

हा विजय मिळवल्यानंतर, रवींद्र जडेजा आणि ब्रावोने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते आगळी वेगळी स्टेप करताना दिसून येत आहे. यामध्ये दोघांनीही चेन्नई संघाची जर्सी परिधान केली आहे. तसेच जडेजाने काळया रंगाचा चष्मा घातला आहे. या व्हिडिओ नंतर सीएसकेच्या ताफ्यात सगळीकडे त्याच्या सेलिब्रेशनचं क्रेझ पसरला आहे. धोनीनेही हे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1384381904074395651?s=20

चेन्नई संघाकडून फलंदाजी करताना, फाफ डू प्लेसीने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली होती. अंबाती रायुडूने २७ आणि मोईन अलीने २६ धावांची खेळी केली होती. २० षटकांअखेर चेन्नई संघाला ९ बाद १८८ धावा करण्यात यश आले होते. तसेच या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर जयदेव उनाडकटने २४ धावा केल्या होत्या. २० षटकांअखेर राजस्थान रॉयल्स संघाला ९ बाद १४३ धावा करता आल्या. यासह चेन्नईने हा सामना आपल्या खिशात घातला.

महत्वाच्या बातम्या:

फुटबॉल जगतात आले वादळ, या बड्या युरोपियन संघानी उभारली बंडखोर लीग

विराटचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पडणार लांबणीवर? वाचा काय आहे प्रकरण

DC vs MI Live : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये केले हे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---